बंद

    राज्‍य शुश्रृषा कक्ष

    • तारीख : 21/08/2025 -

    प्रस्‍तावना

    सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या अंतर्गत आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयाच्‍या नियंञणाखाली राज्‍य शुश्रृषा कक्ष,उपसंचालक आरोग्‍य सेवा (शुश्रृषा) यांचे विभागांतर्गत परिचारीका प्रशिक्षण संस्‍था व राज्‍यस्‍तरीय परिचारीका संवर्गातर्गंत अधिसेविका, सहायक अधिसेविका, सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका निर्देशिका, पाठयनिर्देंशिका, सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका, बालरुग्‍ण तज्ञ परिचारीका व मनोरुग्‍णतज्ञ परिचारीका यांची आस्‍थापना कार्यरत आहे. उपसंचालक परिमंडळे यांचे स्‍तरावरुन अधिपरिचारीका व परिसेविका यांची आस्‍थापना कार्यरत आहे. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा परिषद यांचे स्‍तरावरुन एएनएम व एलएचव्‍ही या पदांची आस्‍थापना हाताळण्‍यात येते. या दोन्‍ही कार्यालयांना त्‍यांच्‍याकडील परिचारीकांच्‍या आस्‍थापने संदर्भात या कार्यालयामार्फत मार्गदर्शन करण्‍यात येते.

    उदिष्‍टे

    1. विभागांतर्गंत कार्यरत सर्व परिचारीका संवर्गाचे आस्‍थापना विषयक सर्व सेवा विषयक बाबी हाताळणे.
    2. सार्वजनिक आरोग्‍य विभागातंर्गत कार्यरत नर्सिंग संवर्गाची कार्यक्षमता वाढविणे.
    3. परिचर्या शिक्षण संस्‍थाचे निरीक्षण करुन भारतीय परिचर्या परिषदेच्‍या मानंकानुसार शैक्षणिक कार्यक्रम राबविण्‍याबाबत निरीक्षण करुन मार्गदर्शन करणे आणि परिचर्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचाविणे.
    4. विभागांतर्गत कार्यरत परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, महाविद्यालय व विशेष नर्सिंग पदविका (Specialized Diploma) संस्‍थांना भेटी देणे.
    5. समाजाच्‍या आरोग्‍य गरजेनुसार नवीन जिल्‍हयात जीएनएम,बीएस्‍सी नर्सिंग व विशेष नर्सिंग पदविका (Specialized Diploma) अभ्‍यासक्रम सुरु करणे.
    6. स्‍टेट नोडल सेंटर, बीएसस्‍सी म‍हाविद्यालये, SMTI अशा नवीन संस्‍था कार्यान्वित करणे व जीएनएम प्रशिक्षण संस्‍थांचे बळकटीकरण करणे.
    7. माता व बालकांना उच्‍च दर्जाची व आदरयुक्‍त आरोग्‍य सेवा SMTI मार्फत देणेकरिता नर्स प्रॅक्टिशनर व नर्स मिडवायफरी शैक्षणिक कार्यक्रम सुरु करणे .
    8. शुश्रृषा संवर्गाची कार्यक्षमता व गुणवत्‍ता स्‍तर वाढविणेकरीता प्रशिक्षण आयोजित करणे.
    9. विविध सेवातंर्गत प्रशिक्षण व उच्‍च शिक्षणाच्‍या सहाय्याने परिचारीकांची कार्यक्षमता वाढविणे व परिचारीकांचे ज्ञान कौशल्‍य वाढविणेकरीता त्‍यांना सेवांतर्गत एमएस्‍सी,पी.बी.बीएस्‍सी, पीएचएन,डीपीएन व एलएचव्‍ही या प्रशिक्षणासाठी प्रोत्‍साहन देणे व अध्‍ययन रजा मंजूर करणे.
    10. समाजाभिमुख आरोग्‍य सेवा देणे तसेच वेगवेगळया आजाराचा प्रतिबंध व उपलब्‍ध आरोग्‍य सेवाबाबत जनजागृती करणे.
    11. परिचर्या व्‍यवसायाशी निगडीत केंद्रशासनाच्‍या व राज्‍य शासनाच्‍या शैक्षणिक योजना व कार्यक्रम रा‍बविणे.
    12. विभागीय स्किल लॅबना भेटी देणे व त्‍या मार्फत कार्यरत प्रशिक्षणाची पाहणी करणे.
    13. नर्सिंग शिक्षणाचा दर्जा वाढविण्‍याकरीता उत्‍तम शैक्षणिक कार्यपध्‍दती (Best Nursing Practices)
    14. परिचर्या संवर्गाशी निगडीत न्‍यायालयीन प्रकरण व माहिती अधिकार बाबतचे प्रकरणे हाताळणे.
    15. परिचारीकांच्‍या विविध मागण्‍यांबाबत शासन मान्‍य परिचारीका संघटनेसोबत बैठक आयोजित करुन संघटनांच्‍या मागण्‍यांवर कार्यवाही करुन तोडगा काढणे व परिचारीकांच्‍या अडचणी सोडविणे.
    16. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत कार्यरत परिचारीका संवर्गाच्‍या आस्‍थापनाविषयक मार्गदर्शन करणे.

    अंमलबजावणी पध्‍दती

    विभागांतर्गत उपसंचालक आरोग्‍य सेवा परिमंडळ , जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक,जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांचे मार्फत वेळोवेळी बैठका, भेटी देवून अंमलबजावणी व आरोग्‍य सेवा देणेबाबत समुपदेशन करणे, उत्‍तम सेवा देणेबाबत योजना आखणे. तसेच केंद्र व राज्‍य शासनांच्‍या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करणे.

    आरोग्‍य सेवा आयुक्‍तालय यांच्‍या अधिपत्‍याखालील कार्यरत परिचारीका प्रशिक्षण संस्‍था

    अ.क्र. परिचर्या प्रशिक्षण संस्‍थेचे नाव एकूण संस्‍था प्रतिवर्षी विद्यार्थ्‍यी संख्‍या
    बी. एस्सी. नर्सिंग ०४ १७०
    एएनएम प्रशिक्षण संस्‍था ३५ १४००
    जीएनएम प्रशिक्षण संस्‍था २४ ९६०
    एलएचव्हि प्रशिक्षण संस्‍था ३२ १२८०
    सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका प्रशिक्षणसंस्‍था नागपूर (स्‍वतंञ) ३०
    डीपीएन प्रशिक्षण संस्‍था ४०
    एकुण ९८ ३८८०

    जिल्‍हा निहाय परिचर्या कार्यरत प्रशिक्षण संस्‍था

    अ.क्र. परिमंडळ परिचर्या प्रशिक्षण संस्‍था एएनएम जीएनएम एलएचव्हि पीएचएन डीपीएन
    ठाणे मुंबई (कामा रुग्‍णालय)
    वि.सा.रु.ठाणे
    जिल्‍हा रुग्‍णालय, रायगड
    जिल्‍हा रुग्‍णालय,पालघर
    एकूण
    5 पुणे जिल्‍हा रुग्‍णालय, पुणे
    6 DH Solapur 0 0 0 0 0
    7 DH Satara 1 1 1 0 0
    Total 2 1 2 0 1
    8 Kolhapur DH Sindhudurga 1 1 1 0 0
    9 Dh Ratnagiri 1 1 1 0 0
    10 DH Kolhapur 1 0 1 0 0
    11 Indira Gandhi G.H. Hospital Ichalkaranji 0 1 0 0 0
    12 DH Sangali 0 0 0 0 0
    Total 3 3 3 0 0
    13 Nashik DH Nashik 1 1 1 0 0
    14 Dh Dhule 1 0 1 0 0
    15 DH Jalgaon 1 1 1 0 0
    16 DH Ahilyanagar 1 1 1 0 0
    17 DH Nandurbar 1 1 1 0 0
    18 GH Malegaon 1 1 0 0 0
    Total 6 5 5 0 0
    19 Chhatrapati Sambhaji Nagar DH Ch. Sambhaji Nagar 1 0 1 0 0
    20 DH Jalna 1 1 1 0 0
    21 DH Parbhani 1 1 1 0 0
    22 DH Hingoli 1 1 1 0 0
    Total 4 3 4 0 0
    23 Latur R.H. Babhalgaon Latur 1 0 1 0 0
    24 DH Beed 1 1 1 0 0
    25 Lokhandi Sawargaon 1 0 1 0 0
    26 DH Nanded 1 1 1 0 0
    27 DH Dharashiv 1 1 1 0 0
    Total 5 3 5 0 0
    28 Akola DWH Akola 1 0 1 0 0
    29 DH Washim 1 1 1 0 0
    30 DH Amravati 0 1 0 0 0
    31 DWH Amravati 1 1 1 0 0
    32 DH Buldhana 1 0 1 0 0
    33 DH Yavatmal 1 0 1 0 0
    34 SDH Pusad 1 0 0 0 0
    Total 6 3 5 0 0
    35 Nagpur Daga W H Nagpur 1 0 1 0 0
    36 PHN School, Nagpur 0 0 0 1 0
    37 DH Chandrapur 1 1 1 0 0
    38 DWH Bhandara 1 1 1 0 0
    39 DH Gadchiroli 1 1 1 0 0
    40 DH Gondiya 1 1 1 0 0
    41 DWH Wardha 1 0 1 0 0
    Total 6 4 6 1 0
    Grand Total 35 24 33 1 2

    विद्यार्थी प्रवेश क्षमता प्रति शैक्षणिक वर्ष

    • एएनएम- ३५:- प्रशिक्षण संस्‍थांची प्रवेशक्षमता ४० याप्रमाणे १४०० आहे.
    • जीएनएम- २४:- प्रशिक्षण संस्‍थांची प्रवेशक्षमता ४० याप्रमाणे ९६० आहे.
    • एलएचव्‍ही- ३२:- प्रशिक्षण संस्‍थांची प्रवेश क्षमता 640(६ महिने कालावधी) वर्षातून दोन तुकडी याप्रमाणे १२८० आहे.
    • पीएचएन- १:- प्रशिक्षण संस्‍थेची प्रवेश क्षमता ही ३० आहे.
    • डीपीएन- २:- प्रशिक्षण संस्‍थेची प्रवेश क्षमता ही २० याप्रमाणे ४० आहे.
    • बी. एस्सी. नर्सिंग- ०४:- प्रशिक्षण संस्‍थेची प्रवेश क्षमतेनुसार १७०
    • सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत परिचारीका संवर्गाची माहिती

      अ.क्र पदाचे नाव मंजूर भरलेली रिक्‍त
      अधिसेविका वर्ग -३ ३७ २९
      सहायक अधिसेविका १७९ १४० ३९
      सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका निर्देशिका ११ ११
      शुश्रृषा अधिकारी/ पाठयनिदेर्शिंका/ चिकित्‍सालयीन निर्देशिका ४२८ १९३ २३५
      सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका २७१ २३४ ३७
      मनोरुग्‍णतज्ञ परिचारीका १६८ ८८ ८०
      बालरुग्‍णतज्ञ परिचारीका १९९ ८५ ११४
      एकूण १२९३ ७६९ ५२४

      शुश्रृषा कक्षांतर्गत रा‍बविण्‍यात येणारे विविध योजना व उपक्रम

      अ) नर्सिंग शिक्षण विषयक कार्यवाही

      1. सार्वजनिक आरोग्‍य विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य अंतर्गत आरोग्‍य सेवा आयु्क्‍तालय अधिनस्‍त सर्व परिचर्या प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया राबविणे.
      2. नर्सिंग विद्यालय/ महाविद्यालयाचे नियमित निरीक्षण व देखरेख करणे.
      3. परिचर्या विद्यालय/महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी,विद्यावेतन,वस्‍तीगृह व इतर अडचणीबाबत मार्गदर्शन करणे.
      4. नर्सिंग स्‍कूलला भेटी देऊन शैक्षणिक कार्यक्रमाची गुणवत्‍ता वाढविण्‍याकरीता शिक्षकांची कार्यक्षमता वाढविणे.
      5. नवीन नर्सिंग सुरु करणे/पदनिर्मिती/पुरवणी मागणी/बांधकाम/वाहन व्‍यवस्‍थाकरीता अनुदान मंजुर करणे.
      6. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियाना अंतर्गत नर्सिंग स्‍कूलसाठी अनुदानाच्‍या (PIP) खर्चाबाबत व उपयोगिता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करणे व त्‍याच्‍या नियमोचित खर्चाबाबत मार्गदर्शन करणे.
      7. नर्सिंग अध्‍यापकिय संवर्गाचे आस्‍थापनाविषयक बाबी, सेवा प्रवेश नियम तयार करणे, कर्तव्‍ये व जबादा-या, बदली, उच्‍चशिक्षण, समावेशन, न्‍यायालयीन प्रकरणे, लोकायुक्‍त प्रकरणे, माहिती अधिकार व इतर सेवाविषयक बाबींवर कार्यवाही करणे.
      8. शैक्षणिक व सेवाविषयक नर्सिंग संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करणे व जुने सेवा प्रवेश नियम सुधारीत करणे.
      9. सेवांतर्गत उच्‍च शिक्षणाकरीता प्रोत्‍साहित करणे, अध्‍ययन रजा मंजुर करणे व पीएचडी नर्सिंग करीता परवानगी देणे.
      10. विविध नर्सिंग स्‍कुल आणि रुग्‍णालयाद्वारे राष्‍ट्रीय नर्सिंग परिषद, कार्यशाळा, सेमिनार आणि स्‍टाफ डेव्‍हलपमेन्‍ट प्रोगामचे आयोजन करणे.
      11. भारतीय परिचर्या परिषद (INC), महाराष्‍ट्र परिचर्या परिषद, महाराष्‍ट्र राज्‍य शुश्रृषा व परावैद्यक शिक्षण मंडळ व केंद्र शासनाच्‍या सहयोगाने व मार्गदर्शक सुचनानुसार परिचर्या शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
      12. नर्सिंग शिक्षणाशी संबंधित न्‍यायालयीन प्रकरणे, माहिती अधिकार, लोकआयुक्‍त प्रकरणे हाताळणे
      13. नर्सिंग संवर्गाच्‍या कर्तव्‍य व जबाबदा-या (Job Descriptions) तयार करुन शासन मान्‍यता घेणे.
      14. नर्सिंग शिक्षणाशी संबंधित राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण राबविणे.

      ब) नर्सिग सेवा (Service) विषयक कार्यवाही

      1. राज्‍य परिचर्या संवर्ग, अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, पाठयनिदेर्शिका, सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका निर्देशिका, मनोरुग्‍ण तज्ञ परिचारीका, बालरुग्‍ण तज्ञ परिचारीका, सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका यांची सेवा जेष्‍ठता सुची व पदोन्‍नती करणे.
      2. नर्सिंग संवर्गाच्‍या आस्‍थापनाविषयक बाबी, सेवा प्रवेश नियम तयार करणे, कर्तव्‍ये व जबादा-या, प्रशासकिय व विनंती बदली, उच्‍चशिक्षण, समावेशन, न्‍यायालयीन प्रकरणे, लोकायुक्‍त प्रकरणे, माहिती अधिकार व इतर सेवाविषयक बाबींवर कार्यवाही करणे.
      3. राज्‍यस्‍तरीय व राष्‍ट्रीय फ्लोरेन्‍स नाईटिंगेल पुरस्‍काराकरीता राज्‍यातील नर्सिंग संवर्गातील कर्मचा-यांची निवडीबाबत कार्यवाही करणे.
      4. विविध परिचारीका संघटनांच्‍या मागण्‍यांवर कार्यवाही करुन तोडगा काढणे व परिचारीकांच्‍या जास्‍तीत जास्‍त अडचणी/समस्‍या सोडविण्‍यासाठी दर तीन महिन्‍यांनी संघटनांच्‍या पदाधिका-यांशी बैठका घेणे व आवश्‍यक कार्यवाही करणे.
      5. सेवातंर्गत विविध प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
      6. विभागातंर्गत कार्यरत विविध रुग्‍णालयांना भेटी देऊन नर्सिंग संवर्गातील कर्मचा-याशी चर्चा करणे अडीअडचणी जाणुन व त्‍या सोडविणे.
      7. विभागीय स्‍कील लॅबना भेटी देऊन प्रशिक्षणाबाबत माहिती घेऊन त्‍यावर देखरेख ठेवणे.
      8. परिचर्या संवर्गाचे ज्ञान व कौशल्‍य वाढविण्‍याकरीता कार्यशाळा आयोजित करणे.

      सन २०२४-२५ वर्षात महत्‍वपुर्ण निर्णय व उल्‍लेखनिय कामगिरी

      • सन २०२४ मध्‍ये एकुण ९९ परिचारीकांना उच्‍चशिक्षणाकरीता अध्‍ययन रजेसह पाठविण्‍यात आले.
      • सातारा,नाशिक व सिंधुदुर्ग जीएनएम नर्सिंग स्‍कूलचे बेसिक बीएस्‍सी नर्सिंग कॉलेज मध्‍ये श्रेणीवर्धन करण्‍याबाबत वैद्यकिय शिक्षण विभाग शासन निर्णय दि.५.६.२०२५ नुसार मान्‍यता मिळालेली आहे.
      • एक सार्वजनिक आरोग्‍य परिचारीका व एक एएनएम यांना राष्‍ट्रीय फ्लोरेन्‍स नाईटिंगल पुरस्‍कार सन २०२४ मध्‍ये सहाय्यक अधिसेविका गडचिरोली व सन २०२५ मध्‍ये एएनएम प्राआकें काठोरा जि. जळगाव यांना प्राप्‍त झालेला आहे.
      • नॅशनल नोडल सेंटर वर्धा येथे परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील शिक्षकांना ६ आठवडयाचे pre-service शुश्रृषा सेवांच्‍या बळकटीकरणाकरीता प्रशिक्षण देण्‍यात येते.
      • बंधपत्रित अधिपरिचारीकांच्‍या दि.१६.४.२०१५ ते दि.२८.०६.२०१९ या कालावधीमधील सेवा नियमीत करण्‍यासाठी सुधारित सेवाप्रवेश नियम शासनास दि.१९.०१.२०२४ रोजी सादर करण्‍यात आले.
      • माता व बालकांना आदरयुक्‍त उच्‍च दर्जाची सेवा देण्‍याकरीता राज्‍यामध्‍ये कस्‍तुरबा नर्सिंग कॉलेज,वर्धा येथे प्रथम बॅच NPME (Nurse Practitioner in Midwifery Educator) ची द्वितीय तुकडीचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे.
      • तसेच SMIT (State Midwifery Training Institute ) जि.स्‍त्री.रु.अकोला,नागपुर व नाशिक येथे कार्यान्वित करण्‍यात आले.
      • परिचर्या संघटनेच्‍या प्रतिनिधीसोबत बैठका घेण्‍यात आल्‍या व समस्‍यांबाबत चर्चा करुन रास्‍त मागण्‍यांबाबत कार्यवाही करण्‍यात आली.
      • दि.०१.०१.२०२४ व दि.०१.०१.२०२५ ची अंतिम सेवाज्‍येष्‍ठता यादी संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली.त्‍यानुसार राज्‍यस्‍तरीय संवर्गाची पदोन्‍नती प्रकियेची कार्यवाही सुरु आहे.
      • शुश्रृषा संवर्गातील शैक्षणिक पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करुन शासनास सादर करण्‍यात आले.
      • राज्‍यातील आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयाच्‍या अधिनस्‍त शैक्षणिक व नर्सिंग सेवा सर्व प्रवर्गाचे सुधारित कर्तव्‍ये व जबाबदा-या (Job Chart) पुर्ण करण्‍यात आले.
      • शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत एएनएम ची प्रवेश प्रकिया संस्‍थास्‍तरावर व जीएनएम, डीपीएन व पीएचएन यांची प्रवेश प्रकिया राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्‍यात येत आहे.

      सन २०२५ वर्षात महत्‍वपुर्ण निर्णय व उल्‍लेखनिय कामगिरी

      • उपसंचालक (शुश्रृषा) व सहायक संचालक (शुश्रृषा) यांनी राऊंड टेबल कॉन्‍फरन्‍स Indian Institute of Health, Gandhinagar, Gujarat येथे Maharashtra State Midwifery Initiative या विषयाचे सादरीकरण केले.
      • अधिसेविका व सहायक अधिसेविका संवर्गाकरीता आरोग्‍य भवन मुंबई येथे “Nursing Leadership in Quality Patient Care in Health Facilities” आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्वक रुग्ण सेवेकरीता नर्सिंग नेतृत्व या विषयावर दि.१२.४.२०२५ रोजी कार्यशाळाआयोजित करण्‍यात आली.
      • राज्‍य प्रसुतीशास्‍त्र कृती दल बैठक दि.२९.१.२०२५ रोजी आयोजित करण्‍यात आली.
      • इंदिरा गांधी सामान्‍य रुग्‍णालय, इचलकरंजी येथे जीएनएम अभ्‍यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
      • सातारा,नाशिक व सिंधुदुर्ग जीएनएम नर्सिंग स्‍कूलचे बेसिक बीएस्‍सी नर्सिंग कॉलेज मध्‍ये श्रेणीवर्धन करण्‍याबाबत वैद्यकिय शिक्षण विभाग शासन निर्णय दि.५.६.२०२५ नुसार अभ्‍यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
      • “Mental Health Care Act 2017- Strengthening Mental Health System through legal safe guard and ethical care with nursing compassion” या विषयावर महाराष्ट्र नर्सिंग परिषद यांच्या मान्यतेने दिनांक २७ जून २०२५ रोजी नर्सिंग संवर्गाकरिता कॉलेज ऑफ सायकियाट्रीक नर्सिंग, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे यांच्या सहयोगाने Continue Professional Development (CPD) चे आयोजन करण्यात आले.

      प्रस्‍तवित नविन नर्सिंग महाविद्यालये

      • जिल्‍हा रुग्‍णालय, बीड येथे पेडियाट्रीक नर्सिंग (१ वर्ष) कालावधीचा शैक्षणिक अभ्‍यासक्रमास सार्वजनिक आरोग्‍य विभागाची मान्‍यता प्राप्‍त झाली.तसेच महाराष्‍ट्र राज्‍य शुश्रृषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत निरीक्षण करण्‍यात आले. वैद्यकिय शिक्षण विभागाचा शासन निर्णय प्राप्‍त झाल्‍यानंतर अभ्‍याक्रम सुरु करण्‍यात येईल.
      • पोस्‍ट बेसिक डिप्‍लोमा इन ऑनकोलॉजी नर्सिंग कामा व आल्‍ब्‍लेस रुग्‍णालय येथे टाटा कॅन्‍सर रुग्‍णालय यांच्‍या संलग्‍नेतेने सुरु करण्‍याचा अभ्‍यासक्रमास सार्वजनिक आरोग्‍य विभागाची मान्‍यता प्राप्‍त झाली.तसेच महाराष्‍ट्र राज्‍य शुश्रृषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत निरीक्षण करण्‍यात आले. वैद्यकिय शिक्षण विभागाचा शासन निर्णय प्राप्‍त झाल्‍यानंतर अभ्‍याक्रम सुरु करण्‍यात येईल.
      • एमएस्‍सी सायकॅयाट्रीक प्रशिक्षण प्रोदशिक मनोरुग्‍णालय, ठाणे व पुणे येथे सुरु करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनास सादर करण्‍यात आला.
      • जीएनएम आणि एएनएम नर्सिंग महाविद्यालय जिल्‍हा रुग्‍णालय, पालघर येथे सुरु करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनास सादर केला. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य शुश्रृषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत निरीक्षण करण्‍यात आले.
      • नर्स प्रक्‍टीशनर मिडवायफरी अभ्‍यासक्रम SMTI (State Midwifery Training Institute) जि.स्‍त्री.रु. अकोला,नागपुर व नाशिक येथे कार्यान्वित करण्‍याबाबत प्रस्‍ताव शासनास करण्‍यात आला. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य शुश्रृषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत निरीक्षण करण्‍यात आले. वैद्यकिय शिक्षण विभागाचा शासन निर्णय प्राप्‍त झाल्‍यानंतर अभ्‍याक्रम सुरु करण्‍यात येईल .

      लाभार्थी:

      Citizen

      फायदे:

      As Above

      अर्ज कसा करावा

      Online