बंद

    रुग्न कल्याण समिती

    • तारीख : 16/01/2025 -

    परिचय-

    बहुतेक विकसनशील देशांमध्ये, मूलभूत प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवांची तरतूद ही सरकार आणि निर्णय घेण्‍या-याची प्रमुख चिंता आहे. वाढती लोकसंख्या आणि वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगती आणि विशेषत: दर्जेदार उपचारात्मक काळजीसाठी लोकांच्या वाढत्या अपेक्षा, तसेच प्रस्थापित संस्थांमार्फत दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे अत्यावश्यक बनले आहे.

    राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत सीएचसीचे भारतीय सार्वजनिक आरोग्य मानक (आयपीएचएस) मध्ये अपग्रेड करणे हा एक प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप आहे. संपूर्ण पारदर्शकतेसह उत्तरदायित्व आणि लोकांच्या सहभागासह शाश्वत दर्जेदार काळजी प्रदान करणे हा उद्देश आहे.

    संकल्‍पना –

    रुग्ण कल्याण समिती / हॉस्पिटल मॅनेजमेंट सोसायटी ही एक साधी पण प्रभावी व्यवस्थापन रचना आहे. ही समिती, जी एक नोंदणीकृत सोसायटी आहे. रुग्णालयांचे व्यवहार, व्यवस्थापन परिपुर्ण करण्यासाठी विश्वस्तांचा एक गट म्हणून रुग्‍ण कल्‍याण समिती काम करत आहे. यामध्ये स्थानिक पंचायती राज संस्था सदस्‍य (पीआरआय), स्‍वंमसेवी संस्‍था, स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि शासन सेवेतील अधिकारी यांचा समावेश आहे. सदर समितीकडे रुग्णालय/सामुदायिक आरोग्य केंद्र/व इतर आरोग्‍य संस्‍थाच्‍या मिळणा-या आरोग्‍य सेवेच्‍या व्‍यवस्‍थापनाची जबाबदारी आहे. रुग्‍ण कल्‍याण समिती हि आरोग्‍य संस्‍थेमध्‍ये योग्‍य आरोग्‍य सेवा मिळत आहे की नाही त्‍यांचे सनियंत्रण दर्जात्‍मक सेवा देण्‍याचे प्रयत्‍न करीत असते.

    रुग्‍ण कल्‍याण समितीचे उद्दिष्‍टे –

    • रुग्‍णालये व बाहय संपर्क क्षेत्रात प्रदान करण्‍यात आलेल्‍या आरोग्‍य सेवामध्‍ये सुधारणा घडवून आणणे.
    • सर्व राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
    • बाहया संपर्क शिबिर, आरोग्‍य मेळावे इ. आरोग्‍य संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्रात आयोजित करणे.
    • शासकिय आरोग्‍य सेवा आवश्‍यकतेनुसार पुरविल्‍या जात आहेत किंवा नाही याची खात्रीकरणे व लाभार्थ्‍याना त्‍यांचा लाभ मिळवून देणे.
    • देणगी अ‍थवा इतर आर्थिक श्रोताच्‍या माध्‍यमातून रुग्‍णालयास मदत करणे.
    • विकेंद्रीतपध्‍दतीने उपलब्‍ध निधीचा वापर करणे.
    • रुग्‍णांना पुरेशा प्रमाणात गुणात्‍मक सेवा उपलब्‍ध करुन देणे करीता सर्व आवश्‍यक प्रक्रिया करणे.

    शासन निर्णयानुसार रुग्‍ण कल्‍याण समितीची कार्यकारणी:-

    शासन निर्णयानुसार रुग्‍ण कल्‍याण समितीची कार्यकारणी
    क्र. समिती समिती सदस्‍य कार्यकारणी नियामक समिती कार्यकारी समिती
    1 जिल्‍हा रुग्‍णालय समिती चेअरमन/अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक
    सह अध्‍यक्ष मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद निरंक
    सदस्‍य सचिव शल्‍य चिकित्‍सक/रुग्‍णालय प्रमुख वरिष्‍ठ वैदयकिय अधिकारी (आर.एम.ओ.)
    2 उपजिल्‍हा रुग्‍णालय चेअरमन/अध्‍यक्ष जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक वैदयकिय अधिक्षक/रुग्‍णालय प्रमुख
    सह अध्‍यक्ष उपविभागीय अधिकारी, महसुल विभाग निरंक
    सदस्‍य सचिव रुग्‍णालयातील वैदयकिय अधिक्षक वैदयकिय अधिकारी, रुग्‍णालय प्रतिनिधी
    3 प्राथमिक आरोग्‍य केंद्र चेअरमन/अध्‍यक्ष प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रातील जिल्‍हा परिषद लोकप्रतिनिधी तालुका वैदयकिय अधिकारी
    सदस्‍य सचिव मुख्‍य वैदयकिय अधिकारी वैदयकिय अधिकारी
    4 जन आरोग्‍य समिती चेअरमन/अध्‍यक्ष जिल्‍हा परिषद सदस्‍य
    सदस्‍य सचिव वैदयकिय अधिकारी
    • रुग्‍ण कल्‍याण समितीचे बैठकीचे नियम:-
    रुग्‍ण कल्‍याण समितीचे बैठकीचे नियम
    कार्यकारणी बैठक तपशिल
    नियामक समिती नियामक समिती पहिली बैठक माहे जूनच्‍या शेवटच्‍या आठवडयात
    दुसरी बैठक माहे जानेवारीच्‍या शेवटच्‍या आठवडयात.
    कार्यकारी समिती एका वर्षात किमान सहा सभा दोन महिन्‍यातून एक सभा याप्रमाणे ६ सभा
    जन आरोग्‍य समिती दरमहा एक याप्रमाणे दरमहा एक सभा (मार्गदर्शक पुस्तिकेत नमुदप्रमाणे याप्रमाणे एकुण १२ सभा
    • आरोग्‍य सं‍स्‍थाचा तपशिल:-
    अ.क्र.१९९ अबंधित निधी कार्यक्रमातंर्गत आरोग्‍य संस्‍थेस देण्‍यात येणा-या निधीचे निकष खालीलप्रमाणे
    अ.क्र संस्‍था एकुण संस्‍था रुकस निधी वार्षिक देखभाल अबंधित निधी एकुण
    1 जि.रु(23)/संदर्भ सेवा(6)/सामान्‍य रु. (2)/मनोरुग्‍णालय(4) 37 5.00 0.00 5.00 10.00
    2 क्षयरोग(4), कुष्‍ठरोग(3), आस्थि रुग्‍णालय(1), जेनेरीक केअर(1)
    9 5.00 0.00 0.00 5.00
    3 उपजिल्‍हा (43) (१००+)/स्‍त्री रुग्‍णालय (19) (१००+) 62 2.00 2.00 1.00 5.00
    4 उपजिल्‍हा (64) (५०-६०)/स्‍त्री रुग्‍णालय (3) (५०-६०) 67 1.00 1.00 0.50 2.50
    5 ग्रामीण रुग्‍णालय 373 1.00 1.00 0.50 2.50
    6 प्राथमिक आरोग्‍य केंद्र 1911 1.00 0.50 0.25 1.75
    7 आरोग्‍यवर्घिनी उपकेंद्र 9886 0.00 0.00 0.50 0.50
    8 उपकेंद्र 866 0.00 0.00 0.20 0.20
    9 ग्राम,आरोग्‍य पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता समिती 39883 0.10 प्रति संस्था 0.10 प्रति संस्था 0.10 प्रति संस्था 0.10
    10 शासकिय इमारत प्रा.आ.पथक 640 0.45 प्रति संस्था 0.45 प्रति संस्था 0.45 प्रति संस्था 0.45
    11 भाडे तत्‍वावर प्रा.आ.पथक 131 0.20 प्रति संस्था 0.20 प्रति संस्था 0.20 प्रति संस्था 0.20
    12 नागरी प्राथमिक आरोग्‍य केंद्र 385 1.75 प्रति संस्था 1.75 प्रति संस्था 1.75 प्रति संस्था 1.75
    13 नागरी सामुदायिक केंद्र 27 2.50 प्रति संस्था 2.50 प्रति संस्था 2.50 प्रति संस्था 2.50
    • रुग्‍ण कल्‍याण समिती सदस्‍यांची भूमिका आणि जबाबदारी
    • महिन्‍याच्‍या अखेरीस रुग्‍णालयातील ओपीडी व ईपीडीचा आढावा घेणे.
    • पुढील महिन्‍यात सेवा तप्‍तर
    • पोहोच सेवा
    • अहवाल सादर करणे

    रुग्‍ण कल्‍याण समिती योजनेअंतर्गत प्राप्‍त निधीचा विनियोगातील आवश्‍यक बाब.

    1. रुग्‍ण कल्‍याण समिती निधीतून खर्चाच्‍या बाबी-
    • गरीब रुग्‍णांना औषधी खरेदी करणे.
    • प्रयोगशालेय चाचण्‍या रुग्‍णालयाबाहेरील संस्‍थेला मोबदला देणे.
    • गरीब रुग्‍णांस संदर्भ सेवा पुरविणे.
    • गरीब रुग्‍ण प्रसुती माता/नवजात बालकांना कपडे पुरविणे.
    • रुग्‍णांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करणे.
    • रुग्‍णालयात रुग्‍णासाठी आसन व्‍यवस्‍था करणे.
    • आंतर रुग्‍णकरीता गरम पाणी उपलब्‍ध होणेस सोलर पावर हिटर बरविणे.
    • किचन/धर्मशाळा किरकोळ दुरुस्‍ती /देखभाल करणे.
    • गरीब रुग्‍णांस भोजन व्‍यवस्‍था पुरविणे.
    • रुग्‍णांलयातील आवश्‍यक उपकरणे/साहित्‍ये खरेदी करणे, व नविण्‍यपुर्ण योजना राबविणे.
    1. वार्षिक देखभाल निधीतून खर्चाच्‍या बाबी-
    • रुग्‍णालयातील शौचालयाची किरकोळ दुरुस्‍ती करणे व स्‍वच्‍छता ठेवणे.
    • सेप्‍टीक टॅक दुरुस्‍ती करणे.
    • सांडपाण्‍याची पाईप दुरुस्‍ती करुन सांडपाण्‍याची योग्‍य विल्‍हेवाट लावणे.
    • पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी साफ करणे व नळाची दुरुस्‍ती करणे.
    • वॉश बेसिनची दुरुस्‍ती करणे.
    • हात धुण्‍यासाठी बेसिनची व्‍यवस्‍था लावणे.
    • बाथरुमची आवश्‍यक दुरुस्‍ती करुन स्‍वच्‍छता ठेवणे.
    • खिडक्‍या व दरवाज्‍याची दुरुस्‍ती करणे.
    • डासांची उत्‍पत्‍ती स्‍थानके नष्‍ट करणे.
    • परिसर स्‍वच्‍छता ठेवणे.
    1. अबंधित निधीतून खर्चाच्‍या बाबी-
    • अत्‍यावश्‍यक औषधे खरेदी करणे आणि प्रयोगशालेय उपकरणे/वस्‍तू /साहित्‍ये खरेदी करणे.
    • फर्निचर /पडदे/पलंग/डेंसिग साहित्‍ये-(मलमपट्टी /कॉटन) इ.खरेदी करणे.
    • आणिबाणीच्‍या वेळी रुग्‍णांस संदर्भसेवा पुरविणे.
    • साथीच्‍या रोगाचे नमूने तपासणीस पाठविताना झालेला खर्च खर्ची टाकणे.
    • रुग्‍णालयातील कामाच्‍या सुधारणेकरीता अभिनव योजना राबविणे.
    • स्‍टेशनरी ,रजिस्‍टर ,कागदपत्राच्‍या छायांकनासाठी खर्च करता येतो.

    महत्‍वपुर्ण माहिती-

    • राज्‍यात शा.नि. ३० डिसेंबर , २००५ अंतर्गत रुग्‍णालयामध्‍ये व ३१ जानेवारी, २००७ अन्‍वये प्राथमिक आरोग्‍य केंद्रास रुग्‍ण कल्‍याण समिती स्‍थापना करणेस सुचित करण्‍यात आले आहे.
    • रुग्‍ण कल्‍याण समिती ही सहाय्यक धर्मादाय संस्‍थेमार्फत नोंदणीकृत आहेत.
    • रुग्‍ण कल्‍याण समिती वित्‍तीय अधिकार प्रदान केले असून जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी त्‍यांची अमंलबजावणी करीत असते.
    • रुग्‍ण कल्‍याण समितीच्‍या नियामक समिती मंडळामार्फत नियोजन व संनियत्रण केले जाते व कार्यकारी त्‍यांची अंमलबजावणी करावयाची असते.
    • रुग्‍ण कल्‍याण समिती हि देणगी व बॅकेवरील व्‍याजाचा नियोजन करीत असते.
    • रुग्‍ण कल्‍याण समिती संस्‍थात्‍मक प्रसूती होणेकरीता भर देण्‍यास आरोग्‍य संस्‍थाना सुचित करीत असते.
    • नियामक व कार्यकारी मंडळ कार्यकारी रचनेमधील फेरफार असल्‍यास सहाय्यक धर्मादाय संस्‍थेकडे रितसर नोंदणी करावी लागते.
    • केंद्र शासनाकडून प्राप्‍त होणारा वार्षिक देखभाल निधी हा केवळ शासकिय इमारत असलेल्‍या संस्‍थेकरीता वापरात आणला जातो.
    • वार्षिक देखभाल निधीचा उपयोग केवळ किरकोळ दुरुस्‍ती व बळकटीकरण, स्‍वच्‍छतेविषयक उपक्रमासाठी वापरात येतो.
    • अबंधित निधीचा उपयोग तालुकास्‍तरावरील रुग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र व पथक तसेच ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती करता मंजूर करण्‍यात येत असतो.
    • अबंधित निधी , नविन्‍यपुर्ण उपक्रम व अत्‍यावश्‍यक गरजा लक्षात घेऊन उपयोगात आणता येतो.
    • अबंधित निधी केवळ रुग्‍ण कल्‍याणासाठी उपयोगात येत असतो.

    जन आरोग्‍य समिती

    • उपकेंद्र स्‍तरावर भारत सरकार मार्गदर्शक तत्‍वे समिती एबी-एचडब्ल्यूसी साठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र.
    • जिल्‍हास्‍तरावर अंमलबजावणी मार्गदर्शक सुचना पाठविण्‍यात आलेल्‍या आहे.
    • शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्मान भारत योजना जन आरोग्य समितीची स्थापना आणि अंमलबजावणी करण्याबाबत राज्यपाल द्वारे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित.

    ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍व्‍च्‍छता समिती-

    • प्रत्‍येक महसूली गावातील सध्‍याच्‍या ग्रामीण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समितीचे विलीनीकरण करुन त्‍यांचे नामानिधान ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समितीमध्‍ये दि. ६ डिसेंबर २००६ शासन निर्णयाव्‍दारे करण्‍यात आले आहे.
    • प्रत्‍येक महसुली गावात ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती स्‍थापन करण्‍याच्‍या सुचना दि. १७ डिसेंबर २००७ च्‍या पत्राव्‍दारे देण्‍यात आलेल्‍या आहेत.
      कार्यक्षेत्र म्‍हणून समितीच्‍या त्‍या महसूली गावांच्‍या हद्दीतील सर्व गावे,वाडया वस्‍त्‍या पाडे येतील.
    • ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समितीची बैठक महिन्‍यातून किमान एकदा होणे अपेक्षित आहे.ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती ही गावातील नागरीकांच्‍या आरोग्‍य विषयक नियोजन, पर्यवेक्षण, अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील.

    ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍व्‍च्‍छता समितीचे उपक्रम-

    • मासिक बैठक
    • उपलब्‍ध अबंधित निधीचे लेखाविषयक व्‍यवस्‍थापन
    • लेखे अदयावतीकरण
    • अत्‍यावश्‍यक आरोग्‍य उपक्रम राबविणे
    • गावपातळीवर आरोगय सेवांचे सु‍सुत्रिकरण
    • चांगल्‍या आरोग्‍या‍साठी लोकसहभाग वाढविणे
    • गावांचे आरोग्‍य विषयक नियोजन

    ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती-

    • ग्राम आरोग्‍य योजनेची तयारी करणे.
    • ग्राम आरोग्‍य आणि पोषण दिन साजरा करणे.
    • आरोग्‍य विषयक प्रश्‍नासाठी ग्राम सभा आयोजित करणे.
    • गाव आरोग्‍य साजरा करणे
    • कुपोषित मुलांसाठी पोषण योजना राबविणे.
    • प्रसुतीसाठी येणा-या गर्भवती महिलांसाठी वाहतूकीची व्‍यवस्‍था करणे.
    • गरजू रुग्‍णांना पुढील उपचारासाठी पाठविणे.
    • डासोप्‍पत्‍ती स्‍थानके नष्‍ट करणे.
    • आरोग्‍य विषयक जन जागृती करणे.
    • सुरक्षित पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी टिसील खरेदी करणे.
    • किरकोळ पाणी पुरवठा योजनेची दुरुस्‍ती करणे.

    रुग्‍ण कल्‍याण समितीच्‍या योजनेअंतर्गत प्राप्‍त निधीचा विनियोगातील आरकेएस, एएमजी, यूएफ आणि व्हीएचएनएससी खर्चाच्‍या बाबी-

    • गरीब रुग्‍णांना औषधी खरेदी करणे, प्रयोगशालेय चाचण्‍या, रुगणालयाबाहेरील संस्‍थेला मोबदला देणे, गरीब रुग्‍णांस संदर्भ सेवा पुरविणे, गरीब रुग्‍ण प्रसुती माता/नवजात बालकांना कपडे पुरविणे, रुग्‍णांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करणे, किचन / धर्मशाळा किरकोळ दुरुस्‍ती/देखभाल करणे, गरीब रुग्‍णांस भोजन व्‍यवस्‍था पुरविणे, रुग्‍णालयातील आवश्‍यक उपकरणे/ साहित्‍ये खरेदी करणे, नाविन्‍यपुर्ण योजना राबविणे, रुग्‍णालयातील शौचालयाची किरकोळ दुरुस्‍ती करणे व स्‍वच्‍छता ठेवणे, सेप्‍टीक टॅक दुरुस्‍ती करणे , सांडपाण्‍याची पाईप दुरुस्‍ती करुन सांडपाण्‍याची योग्‍या विल्‍हेवाट लावणे, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी साफ करणे व नळाची दुरुस्‍ती करणे, हात धुण्‍यासाठी बेसिनची व्‍यवस्‍था लावणे, बाथरुमची आवश्‍यक दुरुस्‍ती करुन स्‍वच्‍छता ठेवणे, खिडक्‍या व दरवाज्‍याची दुरुस्‍ती करणे, डांसाची उत्‍पत्‍ती स्‍थानके नष्‍ट करणे, अत्‍यावश्‍यक औषधे खरेदी करणे आणि प्रयोगशालेय उपकरणे/ वस्‍तु/ साहित्‍ये खरेदी करणे, फर्निचर /पडदे/पलंग/ड्रेसिंग साहित्‍ये (मलमपट्टी /कॉटन) इ.खरेदी करणे आणि आणिबाणीच्‍या वेळी रुग्‍णांस संदर्भसेवा पुरविणे, साथीच्‍या रोगाचे नमुने तपासणीस पाठवितांना झालेला खर्च खर्ची टाकणे, रुग्‍णालयातील कामाच्‍या सुधारणेकरीता अभिनव योजना राबविणे, स्‍टेशनरी, रजिस्‍टर, कागदपत्राच्‍या छायांकनासाठी खर्च करता येतो.

    कार्यक्रमाशी संबंधित जीआर/परिपत्रक:-:-

    1. रुग्ण कल्याण समिती (रुग्णालय व्यवस्थापन समिती) ची स्थापना – शासन निर्णय क्र. एनआरएचएम 2005/ 744/ सीआर-426/ पीएच-6 दिनांक 30 डिसेंबर, 2005
    2. शुध्दीपत्रक क्र. एनआरएचएम 2008/ 744/ सीआर-426/ पीएच-6 दिनांक 4 मे, 2006
    3. शासन अधिपत्र क्र. एनआरएचएम 2005/ 744/ सीआर-426/ पीएच-6, दिनांक 9 जानेवारी, 2007
    4. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समिती (रुग्णालय व्यवस्थापन समिती) ची स्थापना – शासन निर्णय क्र. एनआरएचएम 2005/ 744/ सीआर-426/ पीएच-6 दिनांक 31 जानेवारी, 2007
    5. रुग्ण कल्याण समितीचा समावेश आमदार/ विधान परिषद सदस्य पत्र क्र. राग्राआ 2008/ प्रक्र 90/ आरोग्य-7 अ, दि. 1 जुलै, 2008
    6. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष जीबी ब्लॉक विकास अधिकारी – शुध्दीपत्रक क्र. एनआरएचएम 2007/ सीआर क्र. 44/ पीएच-7ए, दिनांक 28 जुलै, 2009.
    7. आरकेएस सुधारित रचना जीबी (रुग्णालय व्यवस्थापन समिती) सरकारचा निर्णय क्र. एनएचएम ११२०/प्र.क्र. ७८/आरोग्य-७, तारीख. २६ ऑगस्ट, २०२०
    8. संस्था स्तरावर आरकेएस खात्यात वापरकर्ता शुल्क जमा करणे सरकारचा निर्णय क्र. एनएचएम ११२०/प्र.क्र. ८३/आरोग्य- ७, तारीख. २८ जुलै, २०२१
    9. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी एबी-हॉव्स उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जस अंमलबजावणीचा शेवट

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन