बंद

    मानसिक आरोग्‍य कार्यक्रम

    • तारीख : 21/01/2025 -

    मानसिक आरोग्‍य कार्यक्रम

     

    प्रस्‍तावना  –

    जागतिक आरोग्‍य संघटनेने परिभाषित केले आहे की, मानसिक आरोग्‍य हा आरोग्‍याचा अविभाज्‍य भाग आहे. मानसिक विकार हा सामाजिक, आर्थिक, जैविक आणि पर्यावरणीय घटकांच्‍या श्रेणीद्वारे निर्धारित केला जातो.

    वैद्यकीय दृष्‍टया मानसिक विकार हे एखादया व्‍यक्‍तीच्‍या आकलनशक्‍ती, भावनिक नियमन किंवा वर्तमानामध्‍ये बदल याद्वारे दर्शविले जातात. मानसिक विकारांचे अनेक प्रकार आहेत. मानसिक विकारांना मानसिक आरोग्‍य स्थिती असेही संबोधले जाऊ शकते.ज्‍यामध्‍ये मानसिक विकास, मनोसामाजिक अपंगत्‍व आणि (इतर) मानसिक स्थिती लक्षणीय त्रास, कार्यात बिघाड किंवा स्‍वतःची हानी होण्‍याच्‍या जोखमीशी संबंध आहे.

    बदलते वातावरण, स्‍पर्धात्‍मक जीवन, महामारीचा झालेला उद्रेक,जगण्‍याची अनिश्‍चितता इत्‍यादीमुळे समाजात ताणतणाव, नैराश्‍य, चिंता वाढत जाते आणि त्‍यामुळे अनेकांमध्‍ये मानसिक विकार

    निर्माण होतात.

    शारीरीक आजाराप्रमाणेच मानसिक आजार हे सर्वसामान्‍यपणे आढळून येतात. तथापि योग्‍य निदान करण्‍यासाठी पुरेशा विशिष्‍ट चाचण्‍या / परिक्षणे उपलब्‍ध नसल्‍यामुळे मनसिक रोगाचे निदान करणे हे इतर आजारांपेक्षा कठीण आहे.

     

    कार्यक्रमाची मुख्‍य उद्दिष्‍टये –

    • जिल्‍हा स्‍तरावर जिल्‍हा मानसिक आरोग्‍य युनिट कार्यान्वित करणे.
    • मानसिक आजार ओळखणे आणि उपचार करणे.
    • शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि समुदायाना विशेषता Community Based Services द्वारे सेवा देणे.
    • दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला इतर आरोग्‍य सेवांसह मानसिक आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करुन देणे.
    • मानसिक आरोग्‍य सेवांच्‍या बाबतीत योग्‍य मार्गदर्शनाने सामान्‍य आरोग्‍य सेवांमधील कर्मचा-यांना विविध कार्ये आणि जबाबदार-या सोपवणे आणि आरोग्‍य आणि सामुदायिक सेवांचे प्रशिक्षण देणे.
    • मानिसक आरोग्‍य सेवा इतर सामान्‍य आरोग्‍य सेवांशी जोडणे आणि मानसिक आरोग्‍य सेवेला आरोग्‍याच्‍या मुख्‍य प्रवाहात आणणे.
    • समाजात मानसिक आरोग्‍य सेवा प्रदान करण्‍यात आणि विकसित करण्‍यात लोकांचा सहभाग सुनिश्चित करणे.
    • राज्‍य आणि जिल्‍हा स्‍तरावर जनजागृती करणे.

     

    कार्यक्रम अंमलबजावणी

    • प्रादेशिक मनोरुग्‍णालये
    • राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
    • जिल्‍हा मानसिक आरोग्‍य कार्यक्रम
    • टेलीमानस कार्यक्रम
    प्रादेशिक मनोरुग्‍णालये
    क्र. रुग्णालयाचे नाव मंजुर खाटांची संख्या रुग्‍णांना सेवा देण्‍याकरीता संलंग्‍नीत जिल्‍हे
    प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे २५४० १२  जिल्‍हे- पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर,छ.संभाजीनगर ,  जालना,बीड,धाराशिव ,लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी
    प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे १८५० ९  जिल्‍हे- ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव,   नंदुरबार,मुंबई आणि मुंबई उपनगर
    प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर ९४० ११ जिल्‍हे – नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती,  यवतमाळ,वाशिम,बुलढाणा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली, चंद्रपूर
    प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी ३६५ ४ जिल्‍हे – रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग ,सांगली, कोल्‍हापूर
    इतर रुग्‍णालय
    5 वृध्‍दत्‍व आरोग्‍य व मानसिक आजार केंद्र अंबेजोगाई जि.बीड १०० बीड
    एकूण खाटा ९५ जिल्‍हे३६

    प्रादेशिक मनोरुग्‍णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा –

    • बाह्यरुग्ण सेवा
    • आंतररुग्ण सेवा
    • व्यसनमुक्ती उपचार
    • विविध प्रकारची मानसिक आजार संबंधित उपचार
    • व्यवसाय प्रशिक्षण
    • योगा

    राष्‍ट्रीय मानसिक आरोग्‍य कार्यक्रम

     

    • केंद्र शासनाने राष्‍ट्रीय मानसिक आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम १९९७-९८ साली रायगड जिल्ह्यात व तद्नंतर सर्व जिल्ह्यात कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे .
    • केंद्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय मानसिक आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत ३६ जिल्‍हा रुग्‍णालयात मानसिक आजारावर उपचार करण्‍याची सोय उपलब्‍ध आहे.
    • राज्‍यातील सर्व जिल्‍हयात जिल्‍हा मानसिक आरोग्‍य कार्यक्रम (DMHP) द्वारे मानसिक आरोग्‍याच्‍या सेवा पुरविण्‍यात येतात.

    दिल्‍या जाणा-या सेवा

    • बाह्यरुग्ण सेवा
    • अंतररुग्ण सेवा
    • समुपदेशन
    • औषधोपचार सेवा
    • सर्व वैद्यकिय अधिकरी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण
    • मनशक्ती क्लिनिक – 18९६ प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये सुरू
    • Targeted Intervention- विविध शाळा, कॉलेज, कार्यालये, जेल, वृध्‍दाश्रम, बेघर होम इ. ठिकाणी मानसिक आजारा बाबत जनजागृती व समुपदेशन सत्र.
    • मेमरी क्लिनिक -स्‍मृतीभ्रंश बाधित जेष्‍ठ नागरिकांकरीता विशेष बाहयरुग्‍ण विभाग .

     

    टेली मानस सेवा –

    महाराष्‍ट्रात २४*७ टेली मानस हेल्‍पलाईनद्वारे, एकात्मिक आणि सर्वसमावेशक मानसिक आरोग्‍य सेवा दिली जाते. ही सेवा राज्‍यात  ऑक्‍टोंबर २०२२ पासून टोल फ्री क्रमांक १४४१६ द्वारे सुरु करण्‍यात आली आहे. या अंतर्गत विविध मानसिक समस्‍यांकरीता समुपदेशन करण्‍यात येते.

    राज्‍यात तीन Tele Manas Units ( प्रादेशिक मनोरुग्‍णालय ठाणे,प्रादेशिक मनोरुग्‍णालय पुणे आणि वृध्‍दत्‍व आरोग्‍य व मानसिक आजार केंद्र अंबेजोगाई जि.बीड व एक Mentoring Unit (AIIMS, Nagpur) येथे कार्यान्वित करण्‍यात आले आहे.

    मानसिक आरोग्‍य सेवा कायदा 2017

    • मानसिक आरोग्‍य सेवा कायदा 2017 हा, भारतामध्‍ये 7 एप्रिल 2017 रोजी पारित झाला. विद्यमान मानसिक आरोग्‍य सेवा कायदा 1987 मध्‍ये सुधारणा करुन मानसिक आरोग्‍य सेवा कायदा 2017 हा 7 जुलै 2018 पासून अंमलात आला आहे.
    • या कायदयाचे वैशिष्‍टये म्‍हणजे एखादया व्‍यक्‍तीच्‍या अधिकारांचे संरक्षण करणे.
    • रुग्‍णालयातील मानसिक आजारावरील उपचारांसाठी प्रवेश सुलभ करणे आणि आगाऊ निर्देशाद्ववारे रुग्‍णांस आजारावरील कसे उपचार करायचे आहेत ते ठरविण्‍याचे हक्‍क दिले आहे.
    • महाराष्‍ट्राने मानसिक आरोग्‍य सेवा कायदा (2017) च्‍या आदेशान्‍वये राज्‍य मानसिक आरोग्‍य प्राधिकरण तसेच आठ मानसिक आरोग्‍य आढावा मंडळे (MHRB) स्‍थापन केली आहेत. ज्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रातील 36 जिल्‍हयतील 8 आरोग्‍य मंडळांमधील ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्‍हापूर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, आणि लातूर या 8 आढावा मंडळाचा समावेश आहे.

     

    स्‍मृतीभ्रंश क्लिनिक

    मेमरी क्लिनिक अंतर्गत स्‍मृतीभ्रंश बाधित जेष्‍ठ नागरिकांकरीता विशेष बाहयरुग्‍ण विभाग 34 जिल्‍हयांमध्‍ये सुरु करण्‍यात आले आहे. या अंतर्गत जिल्‍हा मानसिक आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्‍या कर्मचा.यांना विशेष प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. तसेच स्‍मृतीभ्रंश रुग्‍णकरिता मोफत औषधे पुरवली जातात.

     

    मनशक्‍ती क्लिनिक

    राज्‍यामध्‍ये मानसिक आरोग्‍याच्‍या सेवा प्राथमिक आरोग्‍य केंद्रामध्‍ये उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्रात DMHP अंतर्गत  मनशक्‍ती क्लिनिक सुरु करण्‍यात आले आहे.

    लाभार्थी:

    मानसिक विकारांनी ग्रस्त व्यक्ती

    फायदे:

    आंतररुग्‍ण व बाहयरुग्‍ण सेवा

    अर्ज कसा करावा

    जवळच्‍या शासकिय रुग्‍णालयात किंवा प्रादेशिक मनोरुग्‍णालयात संपर्क साधावा.

    संचिका:

    Mental Healthcare Act 2017 along with Amendments & Notifications (5 MB) Minimum Standards for Mental Health Establishment (631 KB) Checklist as per Minimum standards for Mental Health Establishments (6 MB) GR of SMHA (226 KB) GR of MHRB (7 MB) GR of Persons with Disabilities Welfare Department & letter (5 MB) Link for MoHFW Webiste – Mental Health related guidelines & documents (196 KB)