बंद

    राष्ट्रीय वृदधापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम (एनपीएचसीई)

    • तारीख : 21/01/2025 -

    आपणास माहितच आहे की, २००१ च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे ७.५९३ कोटी लोक ६० वर्षांवरील होते, २००१ च्या जनगणनेनुसार वृध्दांचे प्रमाणे ७.७% एवढे होते. ते २०११ मध्ये ८.६% एवढे झाले व २०१६ मध्ये हे प्रमाण ८.९४% एवढे राहील. पुढील ५ वर्षांनी अशाप्रकारे भारतात ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वृदधापकाळातील असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण सुदधा वाढत आहे. म्हणुन केंद्रशासन व राज्यशासनामार्फत राष्ट्रीय वृधधापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

    वृध्दांच्या संख्येत वाढ होणे हे २१ व्या शतकातील प्रगतीचे लक्षण आहे. देशामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार ६० वर्षे वय असणाऱ्यांच्या वयामध्ये ८.६% इतकी वाढ झालेली दिसून येते. ६० वर्षे वयाच्या व्यक्तींमध्ये दरवर्षी ३% इतकी वाढ होत आहे. ही वृध्दांची संख्या सन २०५० पर्यंत ३१९ दश लक्ष पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

    त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य विषयक, सामाजिक आणि आर्थिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विषयक, सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करणे आवश्यक आहे.

    भारतातील अनुदैर्ध्य वृद्धत्वाचा अभ्यास (एल. ए. एस. आय.) लाट 2018-19 च्या सर्वेक्षणानुसार, राज्यामध्ये ६० ते ७४ वय असलेल्या वृध्द नागरीकांची शहरी भागामध्ये १०.१% व ग्रामीण भागामध्ये १३.४% अशी एकूण १२% वाढ झाल्याची दिसून येते.

    कार्यक्रमाची उद्दिष्टये –

    • वृद्धांना प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक, निदानात्मक व उपचारांची सुविधा देणे. वृध्दांच्या आरोग्याच्या समस्या ओळखुन त्यांचे निरासन करणे.
    • वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकिय अधिकारी कर्मचारी आणि कुटुंबातील व्यक्तींना सक्षम बनविणे.
    • आवश्यकतेनुसार वृद्ध रुग्णांना रिजनल जिरीऑट्रीक सेंटर किंवा जिल्हा रुग्णालयासाठी संदर्भित करणे.
    सदर कार्यक्रम ३४ जिल्ह्यांत राबविला जात आहे.
    अ.क्र. जिल्हा वर्ष
    अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम २०१०-११
    नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना आणि परभणी. २०१५-१६
    अकोला, यवतमाळ, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, रायगड, सातारा, पुणे, रत्नागिरी. २०१७-१८
    ठाणे, जळगांव, नागपूर, सोलापूर, सांगली, पालघर. २०१८-१९

    जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमांतर्गत देण्यात येणा-या सेवा व सुविधा

    • जिरीअट्रीक क्लिनीकमध्ये वृधधांना आठवडयातून एक दिवस डेडीकेडेट ओपीडी सुविधा दिल्या जातात. इतर दिवशी जनरल ओपीडी येथे रांग असते.
    • जिरीअट्रीक वॉर्ड १० खाटा (५ खाटा महिलांसाठी व ५ खाटा पुरुषांसाठी) वृधधांकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २ बेड् स बेडरिडन (अंथरुणाला खिळून) असलेल्या रुग्णांकरीता (Pallative careपॅलेटिव्ह काळजीसाठी) राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
    • रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या विषेशतज्ञांच्या सेवा-सुविधा वृधध रुग्णांना पुरविल्या जातात.
    • प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे जिरीअॅट्रीक (वृधधांना) सेवा देण्याकरीता शिबीरे आयोजित करुन तेथून संदर्भित केलेल्या वृधध रुग्णांना भरती करण्यात येते.
    • जिरीऑट्रीक (वृधधांच्या) सुविधेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

    कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणा-या सेवा व सुविधा

    • प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावरुन संदर्भित केलेल्या वृधध रुग्णांसाठी प्र्रथम संदर्भिय युनिट म्हणून काम केले जाते.
    • दर आठवडी एक जेरिअेट्रीक डेडिकेटेड क्लिनिक आयोजित केली जातात. व त्यामध्ये फक्त वृधध रुग्णांना ओपीडी ची सेवा पुरवली जात आहे.
    • कार्यक्रमांतर्गतील वृधध रुगणांना समुपदेशनाची सुविधा देण्यात येते.
    • आवश्यकतेनुसार वृधध रुग्णांची तपासणी, चाचण्या व उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात येतात.
    • कार्यक्रमांतर्गतील वृधध रुगणांना समुपदेशनाची सुविधा देण्यात येते.
    • आवश्यकतेनुसार वृधध रुग्णांची तपासणी, चाचण्या व उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात येतात.

    कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणा-या सेवा व सुविधा

    • आठवडयातून एकदा प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जिरिऑट्रीक क्लिनिकचे आयोजन केले जाते व त्यामध्ये वृद्ध रुग्णांना सेवा पुरविल्या जातात.
    • क्लिनिकमध्ये वृद्ध रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी (दृष्टी), कानांची तपासणी (श्रवण), रक्तदाब तपासणी (बीपी), छाती तपासणी व आवश्यक चाचण्या जशा की ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल इ. केल्या जातात.
    • आवश्यकतेनुसार वृधध रुग्णांना जिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयास संदर्भित करण्यात येते.
    • प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली औषधी सामान्य उपचाराकरीता वृधध रुग्णांना पुरविण्यात येतात.

    उपकेंद्र केंद्र देण्यात येणा-या सेवा व सुविधा

    • सदर कार्यक्रमाबाबत जनजागृती केली जाते. तसेच प्रामुख्याने सकस आहार, नियमित व्यायाम, तंबाखु, धुम्रपान व दारुचे सेवन टाळणे याबाबत समुपदेशन केले जाते.
    • आरोग्य आणि कल्याण चिकित्सालय द्वारा वृधध रुग्णांना कर्मचाऱ्यांद्वारे समुपदेशन केले जाते.

    जनजागृती करण्यासाठी केलेले उपक्रम

    • जिल्हा स्तरावरती १ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृद्धांचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यावेळी वृधध लोकांच्या शारिरिक, मानसिक प्रकारच्या आजारांवरती जनजागृती तसेच त्यांच्या सर्वसामान्य आजारांवरती तपासण्या तसेच उपचार करण्यात येतात.
    • जिल्हास्तरावरती विविध कॅम्पस् घेतले जातात. त्यामध्ये वृधधांची मधुमेह, उच्चरक्तदाब आजारांची तपासणी केली जाते व त्यांना योग्य ते उपचार पुरविले जातात.
    • राष्ट्रीय वृधधपकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रमाविषयी संदेश देणारा वृत्तपत्रात जनजागृतीसाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत.
    • जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या, पथनाटय इत्यादी उपक्रम राबविले जातात. रांगोळी स्पर्धा तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
    जिल्हा स्तरावरील मानवी संसाधनांची स्थिती
    पद स्वीकृत भरलेले रिक्त
    वैद्यकीय अधिकारी / फिजिशियन ३४ १४ २२
    जी.एन.एम. ८२ ७२ १०
    फिजिओथेरपी १७ १३
    बहुउद्देशीय पुनर्वसन कर्मचारी २० १९
    भौतिक कामगिरी
    अ.क्र. पुरवण्यात आलेल्या सेवा २०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५ (डिसेंबर २०२४ पर्यंत)
    वृद्ध व्यक्तींना ओ.पी.डी. मध्ये उपस्थित राहिले ७०२७४९ ४२२९१२ ९३४०८५
    वार्डमध्ये दाखल झालेले रुग्ण ३३३२७ २४७७८ ६३०८८
    पुनर्वसन सेवा प्रदान केलेल्या व्यक्ती २०६६९ १३३९५ ४६७११
    वृद्धांवर केलेले प्रयोगशाळेतील चाचण्या ३२७१५२ १८८९७४ ५८१५५२
    घरच्या दवाखान्यात सेवा पुरवण्यात आलेल्या वृद्ध व्यक्ती ४०८१ ४१३७ १४९९९
    वित्तीय कामगिरी
    अ.क्र. वर्ष मान्यताप्राप्त पी.आय.पी. खर्च टक्केवारी
    २०२२-२०२३ ३०७.३० ५१.५९ १६.७९
    २०२३-२०२४ ३१३.३० १९४.६५ ६२.१३
    २०२४-२०२५ २२०.०६ ९७.९० ४४.४८

    लाभार्थी:

    भारतातील 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची वृद्ध लोकसंख्या

    फायदे:

    प्रचारात्मक, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनशील आरोग्य सेवांमध्ये सहज प्रवेश. पीएचसी, सी. एच. सी., जिल्हा रुग्णालये आणि प्रादेशिक वृद्धत्व केंद्रांमध्ये विशेष आरोग्य सेवा. वृद्धांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी मोफत औषधे आणि पुनर्वसन सेवा. नियमित आरोग्य तपासणी आणि समुपदेशन. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी घरगुती काळजी आणि सहाय्यक उपकरणांची तरतूद. प्रगत उपचारांसाठी संदर्भ सेवा.

    अर्ज कसा करावा

    जवळच्या उप-केंद्राला (एससी), प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्राला (सीएचसी) किंवा जिल्हा रुग्णालयाला भेट द्या. पी. एच. सी./सी. एच. सी. स्तरावर उपलब्ध असलेल्या वृद्ध चिकित्सालयाद्वारे सेवांसाठी नोंदणी करा. वृद्धांची काळजी घेण्याच्या कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी व्हा. निवासी सेवा आणि मदतीसाठी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.