राष्ट्रीय आरोग्य अभियान
प्रस्तावना:
आरोग्य संस्थास्तरावरील कार्यप्रणाली सुरळीतपणे पार पडण्यासाठी मानवी संसाधन (मनुष्यबळ) अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात याचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व स्तरांवर सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण करणे व आरोग्य सेवा सुधारण्याकरिता योग्य मनुष्यबळ उपलब्ध करणे.
उद्दिष्टे:
- राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध आरोग्य संस्थास्तरावर आरोग्य संबंधी उद्दिष्टांची पूर्तता करणे. सक्षम आरोग्य यंत्रणा साध्य करण्यासाठी योग्य कौशल्यपूर्ण मानवी संसाधन (मनुष्यबळ) प्रदान करणे.
- तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे-
- आवश्यक पदांची नियुक्ती करुन विकेंद्रित पदभरतीला प्राधान्य द्यावे-
- मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित कर्मचारी तयार करणे.
- मनुष्यबळसंबंधी नियोजन आणि गुणवत्ता वाढीसाठी एचआरएमआयएस सॉफ्टवेअर विकसित करणे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती % (भौतिक)
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रात विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी मुलाखतीद्वारे (थेट मुलाखत) पदभरती केली जाते. आणि या संवर्गातील पदांव्यतिरिक्त इतर सर्व संवर्गातील पदांवर उमेदवारांची गुणांकन प्रक्रियेद्वारे नियुक्ती केली जाते.
- या संदर्भात दिनांक 27.04.2023 व दि. 03.07.2024 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये भरती प्रक्रिया करीताच्या मार्गदर्शक सुचना सर्व संबंधित जिल्हास्तरावर निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
- नोव्हेंबर ( २०२४-२५ ) राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये ७० टक्के पदे भरण्यात आलेली आहेत.
- केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांकरीता प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर करण्यात येतो. त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता देखील मंजुर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा प्राप्त झालेला आहे.
- मंजुर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मनुष्यबळाकरीता वर्ष २०२४-२५ मध्ये एकुण रू. २३५२८१.१४/- लक्ष निधी मंजूर झालेला आहे. व प्राधान्यक्रमनुसार एकूण रु. १२०५१३.१६ लक्ष निधी उपलब्ध आहे.
- माहे नोव्हेंबर २०२४ अखेर एकूण प्राधान्यक्रम च्या मंजूर निधीनुसार ७५.६६ टक्के खर्च झालेला आहे.
क्र | बाबी | भौतिक स्थिती मंजूर पदे | भौतिक स्थिती भरलेली पदे | भौतिक स्थिती रिक्त पदे | भौतिक स्थिती टक्केवारी (भरलेल्या पदांची ) |
---|---|---|---|---|---|
1 | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान | 38111 | 29497 | 8614 | 77% |
2 | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान | 21065 | 11348 | 9717 | 54% |
3 | समुदाय आरोग्य अधिकारी | 9886 | 7453 | 2433 | 75% |
एकूण नियुक्ती | 69062 | 48298 | 20764 | 70% |
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ खर्चाचा सारांश (आर्थिक)
पीआयपी सीनियर क्रमांक (एफएमआर कोड) | मंजूर निधी( रु. लक्ष ) 2024&25 | प्राधान्यक्रम मंजूर निधी ( रु. लक्ष ) 2024&25 | एकुण खर्च नोव्हेंबर २०२४ | % एकुण खर्च विरुद्ध 2nd प्राधान्यक्रम | % एकुण खर्च विरुद्ध मंजूर निधी |
---|---|---|---|---|---|
185 | 1305056.27 | 77497.95 | 57923.43 | 75% | 43% |
142 | 65175.10 | 23014.24 | 17756.97 | 77% | 27% |
187 | 35049.77 | 20000.98 | 15504.03 | 78% | 44% |
एकूण खर्च | 235281.14 | 120513.16 | 91184.43 | 76% | 39% |
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन