बंद

    राष्‍ट्रीय अंधत्‍व व दृष्‍टीदोष नियंत्रण कार्यक्रम

    • तारीख : 19/01/2025 -

    राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम 1976 सालापासून सुरु करण्‍यांत आला आहे. सन 2017 मध्‍ये
    कार्यक्रमाच्‍या नावात बदल करण्‍यांत आला असून ते राष्‍ट्रीय अंधत्‍व व दृष्‍टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम करण्‍यांत आले
    आहे. केंद्र शासनामार्फत सन 2015-19 मधील जलद सर्वेक्षणानुसार अंधत्‍वाचे प्रमाण सन २००६-०७ या आर्थिक या
    वर्षात 1.1 % वरुन सन 2019-20 या आर्थिक 0.36 % इतके झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या
    राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद केल्यानुसार सन 2025 पर्यंत अंधत्वाचे प्रमाण हे 0.25% पर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात
    आले आहे. मोतिबिंदू शस्‍त्रक्रियेसोबतच डोळयांचे इतर आजारांवर जसे की, काचबिंदू, दृष्‍टीपटल विकार (मधुमेह
    रेटीनोपॅथी, व्हिट्रोरेटीनाचे आजार) लहान मुलांमधील अंधत्‍वावर उपचार करण्‍यावर देखील लक्ष केंद्रीत करण्‍यात
    आले आहे.

    राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमसाठी केंद्र शासनाकडून 100 टक्‍के अनुदान देण्‍यात येत होते. सन 2015-16 पासून 60 टक्‍के केंद्राचा वाटा व 40 टक्‍के राज्‍य शासनाचा वाटा याप्रमाणे अनुदान देण्‍यांत येते.

    कार्यक्रमाची ठळक उद्दिष्टे –

    1. “डोळयांचे आरोग्‍य सर्वांसाठी”हे उद्दिष्ट साध्‍य करण्यासाठी व्‍यापक सार्वत्रिक नेत्र सेवा देणे.
    2. राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमाचे बळकटीकरण करुन डोळयांच्या आजाराबाबत उच्‍च दर्जाच्‍या सेवा लोकांना देणे.
    3. निदान वउपचाराद्वारे मोतिबिंदु रुग्‍णांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी जास्‍तीच्‍या सेवा पुरविणे.
    4. राज्‍यातील सर्व जिल्‍हयातील आरोग्‍य संस्‍थांना साधनसामुग्री व तज्ञ व्‍यक्‍तींची नेमणूक करुन रुग्‍णांना सेवा देणे.
    5. कार्यक्रमात अशासकीय स्‍वयंसेवी संस्‍थांना व खाजगी डॉक्‍टरांना समाविष्‍ट करुन डोळयांचे आजारावरील सेवा पुरविणे.
    6. सामान्‍य जन माणसात डोळयांचे इतर आजार (काचबिंदू, मधुमेह रेटीनोपॅथी, व्हिट्रोरेटीनाचे आजार, लहान मुलांमधील अंधत्‍व ) व त्यावरील उपचारांबाबत आरोग्‍यविषयक शिक्षण देवून जनजागृती करणे व इतर डोळ्यांचे आजारांबाबत मोफत सेवा पुरविणे.
    7. शालेय विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी करुन दृष्‍टीदोष शोधुन काढणे.
    8. सन 2014-15 पासून 40 + वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींची मोफत नेत्र तपासणी करणे.

    कार्यक्रमाची कार्यप्रणाली –

    राज्‍यात कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍याकरीता राज्‍यस्‍तरावर राज्‍य आरोग्‍य सोसायटी (अंनिका) व सर्व जिल्‍हयात जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी (अंनिका) स्‍थापन करण्‍यात आल्‍या आहेत. केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्‍हा स्‍तरावर अधिकार देऊन जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी (अंनिका) मार्फत कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविणेबाबतच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहेत.

    तज्ञ व्‍यक्‍तींना प्रशिक्षण देवून व साहित्‍य सामुग्री पुरवठा करुन कार्यक्रमात सुधारणा करणेस्‍वयंसेवी संस्‍थांचा व खाजगी डॉक्‍टरांचा सहभाग घेऊन डोळयांचे आजारांचे निराकरण करणे. 50 वर्षेवरील सर्वांची तपासणी शिबीरे आयोजित करुन व वाहतूक सेवा देऊन जास्‍तीत जास्‍त अंधत्‍वाचे प्रमाण कमी करणे. शासकीय व स्‍वयंसेवी संस्‍थामार्फत मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया, काच‍बिंदू व इतर नेत्र आजारांबाबत मोफत सेवा पुरविणे.

    राज्‍यात आजमितीस 69 नेत्रपेढया, 46 नेत्र संकलन केंद्र, 201 नेत्र प्रत्‍यारोपण केंद्र कार्यरत आहेत. तसेच राज्‍यात 93 शासकीय नेत्र शस्‍त्रक्रियागृह तसेच 88 अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍था कार्यान्वित आहेत.

    योजनेचे उद्दीष्‍ट साध्‍य करणे करीता खालील बाबींकरीता अर्थसहाय्य –

    • या योजनेमध्‍ये 99% मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया आयओएल वापरून एस. आय. सी. तंत्राद्वारे करण्‍यात येतात.
    • लहान मुलांमध्‍ये व वृध्‍द व्‍यक्‍तींमध्‍ये इतर नेत्र आजाराचीसुध्‍दा काळजी घेण्‍यात आलेली असून, अंधत्‍व येऊ नये म्‍हणून जास्‍तीत जास्‍त भर दिला जाणार आहे. हे उद्दीष्‍ट गाठण्‍यासाठी मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया वाढविणे, जास्‍तीत जास्‍त लोकांना सेवा देणे, आरोग्‍य सेवांचे बळकटीकरणे करणे व जनसहभाग, स्‍वयंसेवी संस्‍था, लोकनियुक्‍त लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन हे उद्दीष्‍ट गाठण्‍यात येणार आहे.
    • शालेय विद्यार्थ्‍यांची नेत्र तपासणी करुन दृष्‍टी दोष आढळून आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना मोफत चष्‍मे वाटप करणे.
    • 40+ वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींच्‍या डोळयांची तपासणी करुन गरजू व गरीब व्‍यक्‍तींना मोफत चष्‍मे वाटप करणे.
    • मृत्‍यू पश्‍चात दान केलेली बुब्‍बुळे जमा करुन नेत्र प्रत्‍यारोपण करणे.
    • सार्वजनिक क्षेत्रातील नेत्र रुग्‍णालयांमार्फत अधिकाधिक क्षमतेने सेवा पुरविणेकरीता विविध स्‍तरावरुन मार्गदर्शन व अर्थसहाय्य पुरवणे.
    • राज्यातील सर्व जिल्‍हा रुग्‍णालयात नेत्ररुग्‍ण कक्ष व नेत्र शस्‍त्रक्रिया गृहाची बांधणी करणे.
    • नेत्रतज्ञांना व नेत्र सहाय्यकांना अद्यावत तांत्रिक शिक्षण देणे.
    • जिल्‍हा रुग्‍णालय/ उपजिल्‍हा रुग्‍णालये/ प्राथमिक आरोग्‍य केंद्र तसेच रिजनल इन्‍स्‍टीटयुट ऑफ ऑप्‍थॅल्‍मोलॉजी यांना अदयावत यंत्र सामुग्रीचा पुरवठा करणे तसेच यंत्र सामुग्रीची देखभाल दुरुस्‍ती करणे.

    केंद्र शासनामार्फत विशेष मोहिम “राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान” माहे जून, २०२२ पासून राबविण्‍यात येत आहे. सदर मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि गंभीर दृष्‍टी क्षीणता (गंभीर दृष्टीदोष एस. व्ही. आय.) कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्‍य देण्‍यात आले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष भरुन काढणेकरीता केंद्र शासनाकडून सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षात २७ लक्ष मोतिबिंदु शस्‍त्रक्रियांचे उद्यिष्‍ट देण्‍यात आले आहे.

    1) मोतीबिंदू शस्त्रक्रिया –
    वर्ष वार्षिक उद्दिष्ट झालेली शस्त्रक्रिया टक्केवारी कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया (आयओएल) कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रियेची टक्केवारी
    2019-20 455000 704813 154 703569 99
    2020-21 339570 228991 67.44 226630 99
    2021-22 373510 551034 147.33 549811 99
    2022-23 776411 873513 112.51 872167 99
    2023-24 931815 945733 101.50 944445 99.86
    2024-25
    (Dec 24)
    1087000 751507 69.10 747532 99.47
    2) नेत्रपेढयांचे कार्य –
    वर्ष उद्दीष्ट जमा नेत्र पटले बुब्बुळरोपण शस्त्रक्रिया
    2019-20 7500 6653 3059
    2020-21 5850 1355 847
    2021-22 6500 3162 1948
    2022-23 5500 4456 2477
    2023-24 6000 5087 2713
    2024-25
    (डिसेंबर, २०२४)
    6200 3794 2316
    शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
    वर्ष तपासलेले विद्यार्थी दृष्टीदोष आढळलेले विद्यार्थी चष्मे पुरविलेले विद्यार्थी
    2019-20 3167593 43203 16614
    2020-21 135722 7600 5480
    2021-22 678446 15237 8633
    2022-23 5915783 59586 19131
    2023-24 4199029 33700 9694
    2024-25
    (डिसेंबर, २०२४)
    2819056 21830 3572
    शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
    वर्ष तपासलेले विद्यार्थी दृष्टीदोष आढळलेले विद्यार्थी चष्मे पुरविलेले विद्यार्थी
    2019-20 3167593 43203 16614
    2020-21 135722 7600 5480
    2021-22 678446 15237 8633
    2022-23 5915783 59586 19131
    2023-24 4199029 33700 9694
    2024-25
    (डिसेंबर, २०२४)
    2819056 21830 3572
    40 वर्षे वयावरील व्यक्तींची नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा अहवाल
    वर्ष 40 वर्षे वयावरील तपासलेले व्यक्ती वाटप केलेले चष्मे
    पुरुष महिला एकूण पुरुष महिला एकूण
    2019-20 60085 71485 131570 10324 10237 20561
    2020-21 20402 22534 42936 1219 1041 2260
    2021-22 49163 55968 105131 10714 11512 22226
    2022-23 99636 122750 219027 30316 33448 63764
    2023-24 121683 138836 267927 81685 89188 170873
    2024-25
    (डिसेंबर, २०२४)
    252060 285843 537903 56900 47546 104446
    दृष्टीदोषाच्या इतर आजार
    अ.क्र. रोगाचे नाव २०१९-२० २०२०-२१ २०२१-२२ २०२२-२३ २०२३-२४
    लेसर उपचारासह मधुमेहजन्य रेटिनॉपॅथी ५१५३ २४४ २३६८ २८७५ १८८२
    ग्लॉकोमा ८८ ५६ ४८८ ४८८ ४८८
    डोळ्यांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया १०९० २११ २३५१० ७२१८ ५१००
    डोळ्यांची बिंदू शस्त्रक्रिया १०१२ १४२ ३९४
    बालपणीचे अंधत्व ११६७ ४८५
    रेटिनोब्लास्टोमा शस्त्रक्रिया १९
    जन्मजात पेशीपेशी शस्त्रक्रिया ६४ २३
    मुलांमध्ये डोळ्यांवर झालेल्या दुखापतींचे व्यवस्थापन ६१७ ७३१ १०२४
    केराटोप्लास्टी ३०५९ ६१४ १६६९ २४७७ २७१३
    १० दृष्टीदोष साधने ८१६ ९६ ३२१ ४२९६ ५१२४
    ११ इतर रुग्णवाहिन्या १५५३० ४०५८ ९३०० ४१८१४९ ४३३८९४
    एकूण ४४७०५ १३९८६ ४८७३१ ४४१०६९ ४५५२५९ ३३२६१२
    राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अर्थसंकल्प व खर्च (रुपये लाखात)
    वर्ष मंजूर अर्थसंकल्प खर्च उपलब्ध निधीच्या टक्केवारी
    2019-20 2375.40 721.64 30.42%
    2020-21 1802.15 460.29 25.54 %
    2021-22 2449.51 949.11 38%
    2022-23 4062.19 968.46 23.25
    2023-24 8084.18 2889.39 35.74
    2024-25
    (डिसेंबर, २०२४)
    2059.05 641.18 31.17%

    लाभार्थी:

    वर उल्लेख केला आहे

    फायदे:

    वर उल्लेख केला आहे

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केला आहे