मोबाईल मेडिकल युनिट
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी केंद्रशासनाने मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प सुरु केलेला आहे. सदर प्रकल्प जिल्हास्तरावर चालविण्यात येतो.
राष्ट्रीय आरोग्य अभियान | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील इतर दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये मंजूर (२७-जिल्ह्यांसाठी) | प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाला- पीएम-जनमन अंतर्गत (पीव्हीटीजी समूहासाठी) (१४-जिल्ह्यांसाठी) | एकूण मंजूर मोबाईल मेडिकल युनिट |
मंजूर | ८७ | १६ | १०३ |
कार्यान्वित | ८४ | १३ | ९७ |
- राज्यातील एकूण १०३मोबाईल मेडिकल युनिट पैकी ८७ मोबाईल मेडिकल युनिट विशेषतः वंचित
- आदिवासी समूहांच्या (PVTG) (कातकरी, कोलम व मारिया गोंड) लाभार्थी असलेल्या १४ जिल्ह्यामध्ये मोबाईल मेडिकल युनिट कार्यान्वित करण्यात येत आहेत.
- तसेच उर्वरित १६ मोबाईल मेडिकल युनिट राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी १३ जिल्ह्यामध्ये
कार्यान्वित करण्यात येत आहेत. - राज्यातील आरोग्य केंद्रापासून ५ किलोमीटर दूर असलेल्या भागामध्ये मोबाईल मेडिकल युनिटद्वारे प्राथमिक, उपचारात्मक आणि संदर्भ आरोग्य सेवा नियमितपणे व मोफत पुरविल्या जातात.
- सदर गावांमध्ये मोबाईल मेडिकल युनिटद्वारे आरसीएच, लसीकरण, सिकलसेल रोग, औषधे आणि निदान, एनसीडी इत्यादी आरोग्य सेवा लाभार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत देण्यात येणे व सर्व लाभार्थ्यांचे आरोग्य सेवांची परिपूर्णता करणे.
- मोबाईल मेडिकल युनिट मध्ये वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, वाहन चालक असे एकूण ५ कर्मचारी प्रती मोबाईल मेडिकल युनिट मध्ये कार्यरत असतात.
- मोबाईल मेडिकल युनिटच्या आगाऊ फिरती कार्यक्रमाप्रमाणे (एटीपी) दररोज १ किंवा २ गावांना महिन्यातील २५ दिवसांमध्ये कमीतकमी २ वेळा किंवा जास्तीत जास्त ४ वेळा क्षेत्र भेटी देण्यात येतात.
- मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पाची जिल्हास्तरावर अंमलबजावणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्या येते.
निरीक्षक | प्रगती |
---|---|
क्षेत्रभेट देण्यात आलेल्या गावांची संख्या | १५३१४ |
ओ. पी. डी बाहय रुग्ण तपासणी | ६५२७८१ |
प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात तपासणी | ४१७९४३ |
लसीकरण | ६१७८९ |
लॅब टेस्ट | १६६९१४ |
सिकलसेल रुग्ण तपासणी | ८९७३८ |
मधुमेह रुग्ण तपासणी | १८२४१५ |
क्षयरोग रुग्ण तपासण | २४०७६९ |
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑफलाइन