मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (आशा)
आशा कार्यक्रम
मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते राज्यात सन २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आशा ही समुदाय स्वयंसेवक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्य संदर्भात जागृकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा महत्वपुर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे. आशा ही स्थानिक रहिवासी असल्याने, स्थानिक पातळी सुसंवाद निर्माण करणे आशांना सहज शक्य झालेले आहे. विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात आशांच्या मदतीने करण्यात येत असून त्यात प्रामुख्याने लसीकरण, पल्स पोलिओ, कुष्टरोग व क्षयरोग नियंत्रण, आरोग्यवर्धिनी, कोविड, एनसीडी व इतर आरोग्य विषयक कार्यक्रमाचा समावेश आहे. आशांच्या मदतीने राज्यातील माता व बालमृत्यू कमी करण्याचा प्रयत्न सुरु असून एचबीएनसी (घरी आधारित नवजात शिशु काळजी) व एचबीवायसी ( घरी आधारित तरुणांची काळजी) कार्यक्रमाची अंमबलजावणी करण्यात येत आहे.
आशा योजनेचे उदिृष्ट –
- आशांनी कार्यक्षेत्रात भेटी देऊन आरोग्य सेवांबाबत जागृतता करणे.
- आरोग्य संस्थामध्ये मिळणा-या सेवांबाबत माहिती देणे
- समाज व परिसरामध्ये आरोग्य दर्जा उंचावणेसाठी प्रयत्न करणे
- रूग्णांना आरोग्य संस्थामध्ये उपचार घेणेसाठी प्रवृत्त करणे
- माता मृत्यु बाल मृत्यु रोखणेकरिता कार्यवाही करणे
- कार्यक्षेत्रातील बालकांचे लसीकरण पुर्ण करून घेणे.
- विविध समित्यांमध्ये प्रतिनिधित्व करणे
आशांच्या निवड प्रक्रिया- ग्रामीण भागात –
- शैक्षणिक पाञता – ८ वी उत्तीर्ण (आदिवासी क्षेञाकरिता) व १० वी उत्तीर्ण (बिगर आदिवासी क्षेञाकरिता). उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दयावे.
- साधारणतः १००० लोकसंख्येस १ याप्रमाणात आशांची निवड करण्यात येते.
- वय – महिलेचे वय २5 ते ४५ वर्ष
- आशा कार्यक्षेञातील कायमची स्थानिक रहिवासी व विवाहित महिला असावी.
- आदिवासी, विधवा, परितक्त्या महिलांना व आरोग्य निगडित अनुभव असणा़यांना प्राधान्य दयावे.
- वर नमूद निकष पूर्ण करित असलेली महिलेने तिच्या कार्यक्षेञातील ग्राम आरोग्य पोषण, स्वच्छता व पाणी पुरवठा समितीकडे आशा पदाकरिता अर्ज सादर करण्यात
यावे. - ग्राम आरोग्य पोषण, स्वच्छता व पाणी पुरवठा समितीने आशा पदासाठी आलेले अर्जाची छाननी करावी.
- ग्राम आरोग्य पोषण, स्वच्छता व पाणी पुरवठा समितीने वर नमूद निकषांची पूर्तता करित असलेल्या पाञ महिलांचे अर्ज एकास तीन या प्रमाणात ग्रामसभेमध्ये सादर
करावे. - ग्रामसभेने पाञ अर्जावर चर्चा करुन आशा पदाकरिता एका महिलेची निवड करावी.
- निवड झालेल्या महिलेचा प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात यावा.
- तालुका आरोग्य अधिकारी सदर महिलेस आशा पदाचे नियुक्ती पञ देतील.
नागरी भागात –
- शैक्षणिक पाञता – किमान १० वी उत्तीर्ण, उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य.
- साधारणतः २००० ते २५०० लोकसंख्येस १ याप्रामणात आशांची निवड करण्यात येते.
- वय – महिलेचे वय २५ ते ४५ वर्ष
- आशा कार्यक्षेञातील कायमची स्थानिक रहिवासी व विवाहित महिला असावी.
- वर नमूद निकष पूर्ण करित असलेली महिलेने आशा पदाकरिता नागरी प्रा. आ.केंद्र येथे अर्ज प्राप्त करुन नागरी प्राआकेंद्र स्तरावरील समिती मुलाखतीच्या आधारे आशांची
निवड करेल.
क्र. | अधिका-यांचे नाव | पद |
---|---|---|
1 | वैद्यकिय अधिकारी, नागरी प्रा. आ. केंद्र | अध्यक्ष |
2 | नागरी प्रा. आ. केंद्रस्तरावर कार्यरत स्टॉफ नर्स/ पी. एच. एन. /
जी. एन. एम/ ए. एन. एम |
सदस्य |
3 | मुख्यसेविका, आ. सी. डि. एस. | सदस्य |
4 | मनपा / नगर परिषद शाळेतील प्राथमिक किंवा उच्च माध्यमिक
महिला शिक्षिका |
सदस्य |
- त्यानंतर वर नमूद समिती आशा पदाकरिता निवड केलेल्या महिलांची यादी महानगरपालिका/नगरपालिका/कटकमंडळे स्तरावरील समितीकडे मान्यकतेकरिता पाठवेल.
क्र. | अधिका-यांचे नाव | पद |
---|---|---|
1 | सभापती, महिला व बालकल्याण समिती, मनपा / नगरपालिका | अध्यक्ष |
2 | उपसभापती, महिला व बालकल्याण समिती, मनपा / महानगरपालिका | सदस्य |
3 | वैद्यकिय अधिकारी आरोग्य, मनपाकरिता /तालुका आरोग्य अधिकारी संबधित नगरपालिकाकरिता | सदस्य |
4 | प्रकल्प अधिकारी, आय. सी. डि. एस, मनपाकरिता / नगरपालिकाकरिता | सदस्य |
5 | प्रकल्प अधिकारी, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, मनपाकरिता / नगरपालिकाकरिता | सदस्य |
- सदर समितीची मान्यता प्राप्त झाल्यांनतर वैद्यकिय अधिकारी आरोग्य महानगरपालिका व तालुका आरोग्य अधिकारी संबधित नगरपालिकाकरिता निवड झालेल्या महिलेस आशा म्हणून नियुक्ती पञ देतील.
गटप्रवर्तक – आदिवासी क्षेञात १० आशामागे १ गटप्रवर्तक असून बिगर आदिवासी क्षेञात साधारण २० ते २५ आशांमागे एक गटप्रवर्तक आहेत.आशा गटप्रवर्तक मंजुर पदे- राज्यात ८००८५ आशा स्वयंसेविकांची पदे व ३६६४ गटप्रवर्तकांची पदे मंजुर करण्यात आली आहेत.आशा स्वयंसेविका यांना केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार खालीलप्रमाणे विविध प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षणाचे प्रकार | प्रशिक्षणाचा कालावधी |
---|---|
रमनकह+अ कार्यक्रमातंर्गत आशांचे प्रशिक्षण | |
इंडक्शन प्रशिक्षण | ८ दिवस |
एच.बी.एन.सी 6th मॉडयुल प्रशिक्षण | ५ दिवस |
एच.बी.एन.सी ७th मॉडयुल प्रशिक्षण | ५ दिवस |
एच.बी.एन.सी ४th मॉडयुल प्रशिक्षण | ५ दिवस |
एन.सी.डी प्रशिक्षण | ५ दिवस |
एच.बी.वाय.सी प्रशिक्षण | ५ दिवस |
विस्तारित पॅकेज कार्यक्रमातंर्गत आशांचे प्रशिक्षण | |
मानसिक आरोग्य प्रशिक्षण | ३ दिवस |
पॅलेटिव्ह व वृद्ध केअर | ५ दिवस |
ओईईई प्रशिक्षण | ५ दिवस |
ईट राईट प्रशिक्षण | १ दिवस |
आशांना केंद्र शासन स्तरावरुन देण्यात येत असलेला कामावर आधारीत मोबदला – आशांना केंद्र शासनाने प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर केल्याप्रमाणे ग्रामीण आशांसाठी ५8 बाबींवर व शहरी आशांसाठी ३८ बाबींवर कामावर आधारीत मोबदला अदा करण्यात येत असून याबाबीमध्ये चार रुटीन बाबींचा समावेश आहे.केंद्रशासनस्तरावरून नियमित क्रियाकलाप अतंर्गत खालील चार बाबींवर आशांना रू.२०००/- कामावर आधारित मोबदला लागु करण्यात आला आहे.
- माहिती व अहवालाचे अचुक संकलन व अहवाल सादरीकरणाकरीता – (रु.१५००/- दरमहा)
- ग्रामरजिस्टर तयार करणे. रु. ३००/- दरमहा
- जन्म व मृत्यूची नोंद ठेवणे. रु. ३००/- दरमहा
- पात्र जोडप्याची यादी तयार करणे. रु. ३००/- दरमहा
- गर्भवती महिलांची यादी तयार करणे. रु. ३००/- दरमहा
- लसीकरणास पात्र बालकांची यादी तयार करणे रु. ३००/- दरमहा
- प्रा.आ.केंद्र/ नागरी प्रा.आ.केंद्र स्तरावरील मासीक सभा – रु.१५०/- दरमहा
- व्हीएचएनडी/ युएचएनडी आयोजनात सक्रिय सहभागाकरीता रु.२०० /- दरमहा
- व्हीएचएनएससी/ महिला आरोग्य समितीची मासिक सभा रु.१५० /- दरमहा
अ.क्र. | हेअद्स | केंद्रीय निधी (रु. 2000/-) | दि. १७ जुलै २०२० (मोबदला रु. २०००/- प्रमाणे) | दि. ९ सप्टेंबर २०२१ (मोबदला रु. १५००/- प्रमाणे) | दि. १० एप्रिल २०२३ (मोबदला रु. १५००/- प्रमाणे) | दि. १४ मार्च २०२४ (मोबदला रु. ५०००/- प्रमाणे) | एकूण |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | माहिती व अहवालाचे अचुक संकलन व सादरीकरण | रु. १५००/- | रु.१५००/- | रु. ७५०/- | रु.8००/- | रू. ५०००/- | रु.३0५०/- |
२ | व्हीएचएनएससीची बैठक/ महिला आरोग्य समितीची बैठक | रु. १५०/- | रु.१५०/- | रु. ७५/- | रु. ३००/- | रु.५२५/- | |
३ | व्हीएचएनडी / युएचएनडी | रु. २००/- | रु.२००/- | रु. १००/- | रु. ३००/- | रु.६००/- | |
४ | पीएचसी / युपीएचसी वरील मासिक सभा | रु. १५०/- | रु.१५०/- | रु. ७५/- | रु. १00/- | रु.३२५/- | |
५ | कोवीड कामकाजाकरीता | – | – | रु. ५०० /- | रु.५०० /- | ||
एकूण | रु.२०००/- | रु.२000/- | रु.१५००/- | रु. १५००/- | रू. ५०००/- | रू.१००००/- |
अनु. क्र | प्रोत्साहन संवर्ग | राज्य सरकारने मंजूर केलेले प्रोत्साहन |
---|---|---|
१ | प्रत्येकी १ क्षेत्र भेटीसाठी रु. २६८/- (जास्तीत जास्त २५ क्षेत्रभेटी) | रु. ६७००/- दरमहा |
२ | कोविड कामकाजांसाठीचा भत्ता | रु. ५००/- दरमहा |
3 | दिनांक 20 सप्टेंबर २०२4 च्या शा. नि.नुसार वाढ | रु. ४०००/- दरमहा |
एकूण | रु. ११2००/- दरमहा |
अनु.क्र | पीआयपी नुसार मंजूर बाबी | केंद्र शासनाचा मोबदला (रु.२०००/-) | दिनांक १७ जुलै २०२० च्या शा. नि. | दिनांक ९ सप्टेंबर २०२१ च्या शा. नि. | एकूण | दिनांक १० एप्रिल २०२३ च्या शा. नि. | दिनांक 20 सप्टेंबर २०२4 च्या शा. नि. |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | दरमहा प्रवास भत्ता – २५ दिवस भेटींकरीता रु. ३००/- प्रति दिवस याप्रमाणे रु. ७५००/- दरमहा प्रवास भत्ता. | रु.७५००/- | रु. ३०००/- | रु. १२००/- | रु.१५००/- | रु.४000/- | रु.१०७००/- |
२ | दरमहा दैनिक भत्ता – २५ दिवस भेटींकरीता रु. २५/- प्रति दिवस याप्रमाणे रु. ६२५/- दरमहा दैनिक भत्ता | रु. ६२५/- | |||||
३ | आशा सॉफटवेअर डेटा एन्ट्रीः दरमहा ५ दिवस रु. ५०/- प्रति दिवस प्रमाणे रु.२५०/- दरमहा | रु.२५०/- | |||||
४ | तालुकास्तरावरील दरमहा मासिक सभा – रु. २००/- दरमहा | रु. २००/- | रु. २००/- | ||||
५ | दरमहा मोबाईल भत्ता – रु. १५०/- | रु. १५०/- | रु. १५०/- | ||||
६ | गटप्रवर्तकांना स्टेशनरी भत्ता रु. ५०/- दरमहा | रु. ५०/- | |||||
७ | कोवीड कामकाजाकरीता दरमहा | – | रु.५०० /- | रु.५०० /- | |||
भेटी व बैठका व कोविड व इतर एकूण दरमहा कामावर आधारित मोबदला | रु.8775/- | रु. ३०००/- | रु. १७००/- | रु. १५००/- | रु. 40००/- | रु. 11२००/- | |
स्तंभ 1 & 5 | केंद्र शासन रू. ८७७५ | राज्य शासन रू. 11२००/- | एकुण मोबदला रू. केंद्र+राज्य = 19975/- |
राज्य शासनस्तरावरून आशांना सपोर्ट – दि. २६ ऑगस्ट २०२४ च्या शासननिर्णयानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु. 10.00 लक्ष व कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास रु. 5.00 लक्ष इतक्या रक्कमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यात आले आहे.
केंद्रस्तरावरून आशांना देण्यात येत असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना -केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जीवन ज्योती विमा योजना ( वार्षिक रु. ४३६/- ) व प्रधानमंत्री अपघात सुरक्षा विमा योजना ( वार्षिक रु. रु. २०/-) लागू करण्यात आली आहे.
अनु. | योजना | लाभ | विमा योजना घेतलेल्या आशा | विमा योजनेचा लाभ घेतलेल्या आशा |
---|---|---|---|---|
1 | जीवन ज्योती विमा योजना | कोणत्याही कारणाने आशा/ गटप्रवर्तकांचा मृत्यू झाल्यास आशांच्या वारसदारास रु. २.०० लक्ष मोबदला अदा करण्यात येतो. | 72672 | 13 |
२ | प्रधानमंत्री अपघात सुरक्षा विमा योजना | अपघाताने आशा / गटप्रवर्तकांचा मृत्यू झाल्यास आशांच्या वारसदारास रु.२.०० लक्ष मोबदला किंवा अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास रु. १.०० लक्ष मोबदला अदा करण्यात येतो. | 73869 | 2४ |
- आशा व गटप्रवर्तकांना मोबाईल भत्ता मासिक उपलब्ध करून देण्यात येतो.
- स्टेशनरी भत्ता उपलब्ध करून देण्यात येतो.
- आशा युनिफॉर्म करिता आशा व गटप्रवर्तक यांना निधी उपलब्ध करून देण्यात येतात.
- आशांना गृहभेटीकरिता आवश्यक एचबीएनसी किट/एचबीवायसी किट /औषधी संच उपलब्ध करून देण्यात येतो.
- आशांना केलेल्या कामाचे कौतुक म्हणुन राज्य जिल्हा व तालुकास्तरीय आशा पुरस्कार वितरित करण्यात येतात.
- आशांना प्रोत्साहनपर म्हणुन आशा अभ्यास दोरा आयोजित करण्यात येत आहे.
- ज्या आशांनी बारावी अथवा पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेले असल्यास, किमान ३ वर्ष आशा म्हणुन कार्यरत असल्यास व किमान रू.२०००/- मानधन घेत असल्यास अशा आशांना एएनएम व जीएनएम कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. एएनएम व जीएनएम कोर्स करण्याकरिता आशांसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन