महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकिय सेवा “आपत्कालीन वैद्यकिय सेवा आपल्या दारी”
प्रकल्पाची ओळख
सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत आपत्कालिन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत, गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना सुसज्ज रुग्णवाहीकेत प्राथमिक उपचार करुन रुग्णास नजीकच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्याबाबतची ही योजना आहे. यामध्ये रस्त्यावरील अपघात, सर्व गंभीर स्वरूपाचे आजाराचे रुग्ण, बाळंतपणातील गुंतागुंतीचे रुग्ण, नवजात अर्भकाशी संबंधीत आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, गंभीर आजारामध्ये हृदय रुग्ण, सर्पदंश, अपघात, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदूशी संबंधित गंभीर आजार इत्यादीचा समावेश असतो.
- सदर सेवा ही टोल फ्री क्र. ‘108’ मार्फत कुठल्याही मोबाईल/ लँडलाईन फोनद्वारे उपलब्ध करून घेता येते. तसेच ही सेवा संपुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाते.
- सेवेचे सनियंत्रण औंध उरो रुग्णालय, पुणे येथिल मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, ईआरसी) मधील कर्मचा-यांमार्फत केले जाते. यामध्ये कॉल घेणारे आणि डॉक्टर्स (कन्सलटंट्स) यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.
- या प्रकल्पांतर्गत आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासामध्ये (सुवर्ण तास) तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते.
- तातडीने सेवा पुरविण्यासाठी सर्व रुग्णवाहीकामध्ये अत्याधुनिक कम्प्युटर तंत्रज्ञान एकत्रीकरण, व्हॉइस लॉगर प्रणाली, जीआयएस (भू-स्थान माहिती प्रणाली), जीपीएस (भौगोलिक स्थिती प्रणाली), अव्हीएलटी (स्वयंचलित वाहन स्थान प्रणाली) आणि एमसीएस (मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम) इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे.
- अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसविण्यात आलेली असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित वाहनचालकांमार्फत रुग्णवाहिकेमध्ये २४x७ सेवा पुरविण्यात येते.
- रुग्णवाहीकांमध्ये ॲम्ब्युलन्स कॉट, स्कूप स्ट्रेचर, द्वि-टप्पीय डिफिब्रिलेटर कॅम कार्डिओ मॉनिटर रेकॉर्डर सहित (फक्त एएलएससाठी), ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर (फक्त एएलएससाठी), पल्स ऑक्सिमीटर (फक्त बीएलएससाठी), सक्शन पंप (मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक) आणि ऑक्सिजन वितरण प्रणाली इत्यादी वैद्यकीय उपकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- २४ तास तातडीची रुग्णालयपूर्व व रुग्णालयीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याकरिता शासकीय आणि खाजगी रुग्णालयांबरोबर समन्वय करण्यात येत आहे.
योजनेची वैशिष्टये :
- आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासामध्ये (सुवर्ण तास) वैद्यकीय उपचार देणे.
- २४ तास मोफत तातडीची रुग्णालयपूर्व आणि रुग्णालयीन वैद्यकीय सेवा १०८ टोल फ्री नंबरवर देणे.
- सर्व संबंधित विभागाशी तातडीचा समन्वय साधणे.
रुग्णवाहीका संख्या :
एकूण ९३७ रुग्णवाहिका (२३३ एएलएस डब्ल्यू 704 बीएलएस)
मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (संपर्क कक्ष)
- मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उरो रुग्णालय, औंध पुणे येथे उभारण्यात आलेले आहे.
- आपतग्रस्तास तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे सेवा देण्यासाठी रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की GPS/GPRS व अत्याधुनिक संपर्क यंत्रणा बसविण्यात आलेली असुन त्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास जोडण्यात आलेले आहेत.
प्रशिक्षण
- रुग्णवाहीकांमधील डॉक्टर व वाहन चालक व संपर्क कक्षातील कर्मचा-यांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
- प्रशिक्षणासाठीचे Module Algorithm शासनाच्या तज्ञांच्या मान्यतेने देण्यात आलेले आहे.
- शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आपत्कालीन वैदयकीय सेवा कार्यशाळा/परिषद (चर्चासत्र) याद्वारे आधुनिक पध्दतीच्या व नवनवीन चांगले आणि उत्तम प्रकारे आपत्कालीन परिस्थिती हातळण्याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
डॉक्टर
- शैक्षणिक अर्हता: बीएएमएस/बीयुएमएस
- प्रशिक्षण: एएलएस (अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट) बीएलएस (बेसिक लाइफ सपोर्ट)
- प्रशिक्षण कालावधी: 18 दिवस
प्रतिक्षित वाहनचालक
- शैक्षणिक अर्हता: शासन मान्यतेनुसार वाहन चालकांचा जड वाहनचालविण्याचा परवाना
- प्रशिक्षण: बेसिक लाईफ सपोर्ट, आपत्कालीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका चालविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण इ.
- प्रशिक्षण कालावधी: ७ दिवस
कॉल असिस्टंट
- शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखा पदवीधर
- प्रशिक्षण: कॉल हॅडलिंग
- प्रशिक्षण कालावधी: ३ दिवस
१ फेब्रुवारी २०१४ ते ३1 डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण 1,0५,३५,2४८ आपत्कालीन रुग्णांना महाराष्ट्र आप्तकालीन वैद्यकिय सेवा प्रकल्पांतर्गत रुग्णवाहिकांनी सेवा दिली आहे. सविस्तर अहवाल खालीलप्रमाणे आहे.
अनु. क्र | आणीबाणीचा प्रकार | सेवा दिलेल्या वैद्यकीय आणीबाणीची संख्या |
---|---|---|
१ | अपघात (वाहन) | 530824 |
२ | हल्ला | 86920 |
३ | जळते | 30174 |
४ | कार्डियाक | 85107 |
५ | पडणे | 159334 |
६ | नशा/विषबाधा | 245371 |
७ | प्रसूती / गर्भधारणा | 1707907 |
८ | लाइटनिंग/इलेक्ट्रोक्युशन | 7104 |
९ | वैद्यकीय | 6428719 |
१० | इतर | 949397 |
११ | पॉली ट्रामा | 296815 |
१२ | आत्महत्या/स्वतःला झालेली इजा | 7576 |
एकूण | 10535248 |
अनु. क्र. | जिल्हा | सेवा दिलेली रुग्णसंख्या |
---|---|---|
1 | अहमदनगर | 415455 |
2 | अकोला | 184567 |
3 | अमरावती | 413883 |
4 | औरंगाबाद | 390086 |
5 | बीड | 252531 |
6 | भंडारा | 147133 |
7 | बुलढाणा | 261617 |
8 | चंद्रपूर | 340106 |
9 | धुळे | 170959 |
10 | गडचिरोली | 133256 |
11 | गोंदिया | 181701 |
12 | हिंगोली | 148726 |
13 | जळगाव | 315664 |
14 | जालना | 166039 |
15 | कोल्हापूर | 439651 |
16 | लातूर | 236042 |
17 | मुंबई | 705603 |
18 | नागपूर | 526403 |
19 | नांदेड | 294847 |
20 | नंदुरबार | 134144 |
21 | नाशिक | 382335 |
22 | उस्मानाबाद | 208516 |
23 | पालघर | 257891 |
24 | परभणी | 145110 |
25 | पुणे | 965801 |
26 | रायगड | 189790 |
27 | रत्नागिरी | 224843 |
28 | सांगली | 301064 |
29 | सातारा | 404281 |
30 | सिंधुदुर्ग | 152287 |
31 | सोलापूर | 575380 |
32 | ठाणे | 356892 |
33 | वर्धा | 145640 |
34 | वाशिम | 135836 |
35 | यवतमाळ | 271169 |
एकूण | 10535248 |
लाभार्थी:
रस्त्यावरील अपघात, गंभीर स्वरूपाचे आजार, बाळंतपणातील गुंतागुंतीचे रुग्ण, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, हृदय रुग्ण, सर्पदंश, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदूशी संबंधित गंभीर आजार यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत सापडलेले रुग्ण.
फायदे:
मोफत आपत्कालीन वैद्यकिय सेवा: २४x७ '१०८' टोल फ्री नंबरवर उपलब्ध. सुवर्ण तासांत मदत: आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या सुवर्ण तासामध्ये तातडीने वैद्यकिय उपचार. अत्याधुनिक वैद्यकिय उपकरणे: रुग्णवाहिकांमध्ये डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्रणाली, इत्यादी उपकरणे बसवलेली. प्रशिक्षित वैद्यकिय कर्मचारी: डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णवाहिका चालकांकडून तातडीने सेवा पुरवली जाते. व्यापक सेवा: महाराष्ट्रभर ९३७ रुग्णवाहिका तैनात, जलद आणि प्रभावी आपत्कालीन प्रतिसादासाठी.
अर्ज कसा करावा
एकाच कॉलद्वारे सेवांमध्ये प्रवेश करा, जे जवळच्या उपलब्ध रुग्णवाहिकेकडे नेले जाईल.