बंद

    नर्सिंग कार्यक्रम

    • तारीख : 09/01/2025 -

    नर्सिंग

    कार्यक्रम २०२4-२०२5

    कंत्राटी आरोग्‍य सेविका स्‍टाफ नर्स  व एलएचव्‍ही

    राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानाचे मुख्‍य ध्‍येय बालमृत्‍यु व मातामृत्‍यु कमी करणे आहे. ते साध्‍य करण्‍यासाठी उपकेंद्रस्‍तरावर अतिरिक्‍त एएनएम प्राथमिक आरोग्‍य केंद्रस्‍तरावर प्रसुतीनिकषानुसार अतिरिक्‍त स्‍टाफ नर्स व कामाच्‍या आवश्‍यकते नुसार महाराष्‍ट्रातील  १०६६८ उपकेंद्रे व १८३० प्राथमिक आरोग्‍य केंद्रामध्‍ये अतिरिक्‍त ५१३२ कंत्राटी आरोग्‍य  सेविका ७४५ स्‍टाफ नर्स  व ६९८ एलएचव्‍ही यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तसेच ५०००० पेक्षा कमी लोकसंख्‍या असलेल्‍या नगरपालिका/नगरपंचायतीमध्‍ये लोकसंख्‍येला एक या प्रमाणे कंत्राटी ३७१ अर्बन एएनएम यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. 

    नर्सिंग स्‍कुल बळकटिकरण

    राज्‍यातील सर्व नागरिकांना आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सेवा पुरविण्‍यासाठी परिचारिका हा महत्‍वाचा घटक आहे. परिचारिकांना कौशल्‍यपूर्ण प्रशिक्षण देण्‍याचे काम राज्‍यातील सर्व नर्सिंग स्‍कुल मधून केले जाते. त्‍यामुळे भारतीय परिचारिका परिषदेच्‍या मानांकनानुसार राज्‍यातील नर्सिग स्‍कुल यांना  साधनसामुग्री, सोयी-सुविधा व मनुष्‍यबळ यांनी परिपुर्ण असणे आवश्‍यक आहे. त्‍याकरीता राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत साधनसामुग्री व मनुष्‍यबळ करिता अनुदान पुरविण्‍यात येते. 

    राआअ अतर्गत ३५ एएनएम, 23 जीएनएम,5 एलएचव्ही व 1 पीएचएन अशा एकुण ६४ नर्सिंग स्‍कुल बळकटिकरण करीता मनुष्‍यबळ, नर्सिंग स्कूलसाठी गतिशीलता समर्थन (कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी), आकस्मिकता, अॅफिलेशन फी, टेलिफोन देयक, वॉटर सप्‍लाय देयक, इलेक्‍ट्रीफिकेशन देयक व ऑफीस स्‍टेशनरी इ.)

    स्किल लॅब-

    राज्‍यामध्‍ये नागपुर, पुणे, जालना व नाशिक येथे स्किल लॅब स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या आहेत. स्किल लॅब मध्‍ये  प्रशिक्षण सत्राची जबाबदारी संबंधित प्राचार्य, आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण प्रशिक्षण केंद्र यांची आहे.  स्किल लॅब प्रशिक्षण सत्र हे ६ दिवसांचे असुन  प्रशिक्षण सत्रामध्‍ये  ४ मेडीकल ऑफिसर/डॉक्‍टर व १२ नर्सेस असे एकुन १६ प्रशिक्षणार्थ्‍यांचा समावेश असतो. तसेच प्रत्‍येक महिन्‍याला ३ प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्‍यात येते. तसेच स्किल लॅब मध्‍ये कार्यरत प्रशिक्षकामार्फत दरमहा ५ दिवस  १० आरोग्‍य संस्‍थांना मार्गदर्शन भेट करण्‍यात येतात. याच धर्तीवर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्‍ये जिल्‍हा धाराशिव येथे नव्‍याने स्किल लॅब स्‍थापन करण्‍याची मंजूरी मिळालेली आहे.

     नॅशनल नोडल सेंटर वर्धा-

    महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यात नर्सिंग आणि मिडवाइफरी केडरसाठी ( टयुटर/पीएचएन ) प्री सर्व्हिस एज्युकेशनची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यायोगे सुविधा आणि समुदाय पातळीवर माता, नवजात बालके, बाल आरोग्य आणि कुटुंब नियोजन अधिक प्रभावशाली बनविण्यासाठी शासनाकडून नर्सिंग प्राध्यापकांची क्षमता वाढविण्यासाठी 6 आठवड्याचे प्रशिक्षण आयोजीत करण्‍यात येते. 6 आठवड्याचे प्रशिक्षणामध्‍ये एएनएम / जीएनएम स्‍कुल त्यांची सुविधा आणि क्लिनिकल कौशल्यांमध्ये सुधारणा करणे तसेच माता, नवजात बालके, बाल आरोग्य आणि कुटुंब नियोजन पद्धतींसह त्यांचे ज्ञान अदयावत करणे हे मुख्य उददेश आहेत.

    फ्लोरेन्‍स नाईटिगेल अवॉर्ड- 

    आधुनिक परीचर्येच्‍या जनक फ्लोरेन्‍स नाईटिंगेल यांचा जन्‍मदिवस 12 मे जागतिक परीचारीका दिवस म्‍हणुन साजरा केला जातो. या दिवशी आरोग्‍य सेवेत  उल्‍लेखनिय कार्य  करणा-या परिचारीकांना त्‍यांनी केलेल्‍या कामाचा गौरव म्‍हणुन फ्लोरेन्‍स नाईटिंगेल पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो. 

    एएलएस/बीएलएस  स्किल लॅब –

    सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्‍ये राज्‍यातील २ आरोग्‍य व प्रशिक्षण केंद्राच्‍या ठिकाणी अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट/ बेसिक लाइफ सपोर्ट (एएलएस/बीएलएस) स्किल लॅब मंजूर करण्‍यात आलेली आहे. सदर स्किल  लॅब मध्‍ये वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांना एएलएस/बीएलएस बाबत इतंभुत प्रशिक्षण देण्‍यात येईल. सदर प्रशिक्षणामध्‍ये  आयसीयूमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांना प्राधान्य दिले जाईल.
    सन २०24-2०२5 मध्ये अनुक्रमे वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्सेसच्या 4 बॅचसाठी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. प्रत्येक बॅच मध्‍ये प्रत्येकी 30 प्रशिक्षणार्थीचा सहभाग राहील. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 2 दिवसांचा असेल

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन