टेलिमेडिसिन
टेलिमेडिसीन
-
प्रस्तावना –
राज्यातील ग्रामीण व आदिवासी जनतेसाठी विशेषज्ञमार्फत वैद्यकीय सेवा देण्यासाठी टेलिमेडिसीन ही वैद्यकीय क्षेञात झपाटयाने विकसित होत असलेली यंञणा आहे. विशेषत: यामध्ये टेलिफोन,इंटरनेट किंवा इतर संपर्काव्दारे वैद्यकीय आदान प्रदान करणे शक्य होते. वैद्यकीय सल्लयासाठी आणि कधी कधी दुर्गम भागातील आजारी रूग्णांचे निदान करण्यासाठी या सुविधेचा उपयोग होतो.
-
कार्यक्रमांतर्गत महत्वपूर्ण योजना व झालेले कार्य –
-
टेलिमेडिसीन सुविधव्दारे ग्रामीण भागातील रूग्णांना तज्ञ सल्ला देता येतो.
-
व्हिडिओ कॉन्स्फरसिंगव्दारे तज्ञ सल्ला उपलब्ध करून दिला जातो.
-
वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,तज्ञ व इत्यादीचे वैद्यकीय ज्ञान अद्यावत करण्यासाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण (सी.एम.ई) आयोजित करता येतात.
-
महाराष्ट्रातील टेलिमेडिसीन –
- ७ सप्टेंबर,२००६ रोजी इस्ञोच्या सहाय्याने पथदर्शक प्रकल्प के.ई.एम.हॉस्पिटल,मुंबई या विशेषज्ञ रूग्णालयाव्दारे राज्यातील ५ जिल्हा रूग्णालये लातूर, बीड,नंदूरबार, सिंधुदुर्ग आणि उपजिल्हा रूग्णालय कराड,जि.सातारा येथे टेलिमेडिसीन सुविधा सुरू करण्यात आली.
- सन २००७-०८ मध्ये टेलिमेडिसीन सुविधेचा विस्तार २० जिल्हा रूग्णालये,२ उपजिल्हा रूग्णालये आणि ४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आला आहे.
- फेब्रुवारी २०११ टेलिमेडिसीन नेटवर्क इस्ञो बँडविड्थ वरून बीएनएनएल/ एमटीएनएल ब्रॉडबॅड सुविधेव्दारे स्थलांतर व जोडण्यात आले आहे.
- सन २०११-१२ मध्ये नेटवर्क ३० उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालयात वाढविण्यात आले आहे.
- सन २०१४-१५ टेलिमेडिसीन सुविधेचा विस्तार ५ उच्च लक्ष केंद्रीत/आदिवासी जिल्हयांतील उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालये येथे करण्यात आली आहे. उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालये-मंचर(पूणे),संगमनेर(अहमदनगर),गोंकुदा(नांदेड),जिल्हा रूग्णालय-नांदेड.
- सन २०२०-२१ टेलिमेडिसीन सुविधेचा विस्तार १० उच्च लक्ष केंद्रीत/आदिवासी जिल्हयांमधील उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालये येथे करण्यात आली आहे.
-
सेवा देणा-या आरोग्य संस्था
–
- ६ स्पेशालिस्ट केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे सुरू करण्यात आले आहे आणि एकूण ७९ रूग्ण नोड ज्यापैंकी २४ टेलिमेडिसीन केंद्र हे जिल्हा रूग्णालये व ४९ टेलिमेडिसीन केंद्र हे उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालयात येथे कार्यरत आहेत.
-
मनुष्यबळ –
- एकूण ८० सुविधा व्यवस्थापक पैकी ७० पदे कार्यरत आहे. त्यापैकी उर्वरित १० पदे रिक्त आहेत.
-
कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम –
- व्हिडिओ कॉन्फरसिंग आणि चॅटच्या माध्यमातून तज्ञ सल्ला उपलब्ध करून दिला जातो.
- जिल्हा/उपजिल्हा/ग्रामीणरूग्णालयातील टेलिमेडिसीन केंद्रांमार्फत एकूण १,३४,२४८ रूग्ण संदर्भित करून रूग्णांना तज्ञ सल्ला उपलब्ध करून देण्यात आला.
- जिल्हा/उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालय,टेलिमेडिसीन केंद्रात डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टॉफ यांच्याकरीता आजपर्यंत ६८६ या विषयावर वैद्यकीय ज्ञान अद्यावत करण्यासाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण (सी.एम.ई) आयोजित केले आहे.
-
कार्यक्रमाची सद्यस्थिती तसेच निर्देशक निहाय झालेले कार्य –
वर्ष | संदर्भित केलेल्या व तज्ञ सल्ला मिळालेल्या रूग्णांची संख्या |
---|---|
२०१९-२० | ३१,२८६ |
२०२०-२१ | १२,७८६ |
२०२१-२२ | १५,६६५ |
२०२२-२३ | २५,८०५ |
२०२३-२४ | २७,४०० |
२०२४-२५ (डिसेंबर.२४ ) | २१,३०६ |
एकूण | १,३४,२४८ |
आयुष्मान आरोग्य मंदिर टेलिकन्सलटेशन
आयुष्मान भारत योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्र (उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे टेलिकन्सलटेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार हब आणि स्पोक या मॉडेलचा वापर करून टेलिकन्सलटेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्र (उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र) यांना स्पोक असे संबोधले आहे. सद्यस्थितीत हब २९ जिल्हयांतील सुरू असून उर्वरित ५ जिल्हयांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. हब येथे पाच एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आणि तीन विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (स्ञीरोग तज्ञ,भिषक आणि बालरोग तज्ञ) उपस्थित असतात. स्पोक येथील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आरोग्यवर्धिनी केंद्र येथे येणा-या रूग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,चॅटच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देतात. वैद्यकीय सल्ला दिल्यानंतर रूग्णांना समुदाय आरोग्य अधिकारी/वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ई-प्रिस्क्रिपशन दिले जाते.
केंद्र शासनाने टेलिकन्सलटेशन सेवा सुरू करण्याकरीता इ-संजीवनी नावाचे टेलिमेडिसीन अॅप्लीकेशन शॉर्टलिस्ट केले आहे. सदर अॅप्लीकेशन सी-डॅक मोहाली यांनी तयार केले आहे. आतापर्यंत ८३९० उपकेंद्र, १९०० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ७३२ शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे टेलिकन्सलटेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. आरोग्यवर्धिनी टेलिकन्सलटेशन सेवेव्दारे एकूण ९१,८७,६८२ वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे.
वर्ष | संदर्भित केलेल्या व तज्ञ सल्ला मिळालेल्या रूग्णांची संख्या |
---|---|
२०२०-२१ | ८,७३७ |
२०२१-२२ | ९,८५,६७७ |
२०२२-२३ | ३९,७९,५७५ |
२०२३-२४ | २१,१०,९६१ |
२०२४-२५ (डिसेंबर २४) | १२,५३,२६८ |
एकूण | ९१,८७,६८२ |
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन