पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम (उपशमन/परिहार सेवा)
<div class="text-justify
पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम
(उपशमन/परिहार सेवा)
दिर्घ काळापासून किंवा मोठया आजाराने त्रस्त रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी, तसेच कुटुंबियांचे त्रास कमी करण्यासाठी घेतलेली काळजी म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. दिर्घ काळ असणारे व शारिरीक अपंगत्व आणणा-या व्याधी त्रासदायक असतात. शारिरीक समस्यांसोबतच सामाजिक, भावनिक, आर्थिक आणि अध्यात्मिक त्रासांना सुध्दा सामोरे जावे लागते. पॅलिएटिव्ह केअर हे वैद्यकीय शास्त्रातील असे क्षेत्र आहे जे दुर्धर आजारावर इलाज करीत नसून, या रुग्णांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करते. वेदना व इतर लक्षणापासून आराम पुरविण्याबरोबरच यामध्ये मानसिक वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न केला जातो. दिवसेंदिवस दुर्धर आजारांच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. युनिसेफ इंडिया नुसार भारतामध्ये पॅलिएटिव्ह केअरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या अंदाजे १ कोटी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१२ मध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सन २०१३-१४ मध्ये अमरावती, गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, वर्धा व वाशिम आणि सन २०१४-१५ सातारा व नंदुरबार या जिल्हयांमध्ये कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सन २०१८-१९ च्या मंजुर पीआयपीमध्ये आणखी ९ जिल्हयांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. (सिंधुदूर्ग, पुणे,नाशिक, परभणी, जालना, पालघर, रत्नागिरी, नांदेड आणि उस्मानाबाद). सन २०२१-२२ च्या अंमलबजावणी कृती आराखडयामध्ये नागपूर, औरंगाबाद, जळगांव, लातूर, बीड, हिंगोली, ठाणे व अहमदनगर या ८ जिल्हयांचा समावेश करण्यात आला. सन २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखडयामध्ये अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापुर, सांगली, रायगड, गोंदिया, धुळे, सोलापुर, या ९ जिल्हयांचा समावेश करण्यात आला आहे. पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमामध्ये मुख्यतः आयुष्याच्या शेवटच्या टप्यात व कधीच बरे न होणा-या रुग्णांचा समावेश होतो.
या रुग्णांना उपचारात्मक चिकित्सा उपयोगाची नसून केवळ वेदना व लक्षणे कमी करणारी चिकित्साच उपयुक्त असते. पॅलिएटिव्ह केअर कॅन्सर, पक्षाघात, एच. आय. व्ही./एड्स औषधींने न बरे होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृध्दपकाळाने अपंगत्व आलेले किडनी विकार, लिव्हर विकारग्रस्त इ. रुग्णांना दिली जाते. राज्यामध्ये सदर कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावर स्टेट पॅलिएटिव्ह केअर सेल कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
तसेच १७ जिल्हयांमध्ये जिल्हा स्तरावर पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहेत. त्यापैकी ८ जिल्हयांत आवश्यक प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकारी १ व ४ नर्सेस व १ मल्टी टास्क वर्करची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये एनसीडी कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आठवडयातील निश्चित केलेल्या २ दिवशीय जिल्हा रुग्णालयातील बाहय रुग्ण विभागात रुग्णांची तपासणी करणे तसेच आंतरुग्णांना सेवा देणे व उर्वरीत निवडलेल्या तालुक्यातील रुग्णांना गृहभेटी मार्फत सेवा देणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील पॅलिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत समाविष्ठ जिल्हयांतील जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी १० खाटा राखीव ठेवून त्यासाठी लागणा-या खर्चाची तरतुद करण्यात आलेली आहे.
पॅलिएटिव्ह केअर प्रकल्पाची उद्दीष्टे
- जिल्हा रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पॅलिएटिव्ह केअरचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी व परिचारीकांना देऊन एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे.
- दीर्घ व गंभीर आजाराचे रुग्ण आशा/एएनएम व क्षेत्रीय कर्मचा-यांच्या मदतीने शोधून आरोग्य सेवा देणे. अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करणे.
- पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमांतर्गत आवश्यक असणारी औषधे जिल्हा / उपजिल्हा स्तरावर उपलब्ध करुन देणे.
- कार्यक्रमाबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे.
अ.क्र. | सन २०१३-१४ मध्ये मंजुरी मिळालेली जिल्हे |
अ.क्र. | सन २०१८-१९ मध्ये मंजुरी मिळालेली जिल्हे |
अ.क्र. | सन २०२० – २१ मध्ये मंजुरी मिळालेली जिल्हे |
अ.क्र. | सन २०२२-२३ मध्ये मंजुरी मिळालेली जिल्हे |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | नाशिक | १० | पुणे | १८ | नागपूर | २६ | अकोला |
२ | पालघर | ११ | उस्मानाबाद | १९ | औरंगाबाद | २७ | बुलढाणा |
३ | अमरावती | १२ | परभणी | २० | ठाणे | २८ | यवतमाळ |
४ | भंडारा | १३ | सिंधुदूर्ग | २१ | अहमदनगर | २९ | कोल्हापुर |
५ | चंद्रपूर | १४ | नांदेड | २२ | लातूर | ३० | सांगली |
६ | गडचिरोली | १५ | जालना | २३ | जळगांव | ३१ | रायगड |
७ | वर्धा | १६ | रत्नागिरी | २४ | बीड | ३२ | गोंदिया |
८ | वाशिम | १७ | नंदुरबार | २५ | हिंगोली | ३३ | धुळे |
९ | सातारा | ३४ | सोलापुर |
अनु. क्र. |
जिल्हा | मेडिकल ऑफिसर/फीजिशियन |
मेडिकल ऑफिसर/फीजिशियन |
मेडिकल ऑफिसर/फीजिशियन |
नर्स /जीएनएम | नर्स /जीएनएम | नर्स /जीएनएम | मल्टी टास्क वर्कर / सोशल वर्कर |
मल्टी टास्क वर्कर / सोशल वर्कर |
मल्टी टास्क वर्कर / सोशल वर्कर |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मंजूर | भरलेले | रिक्त | मंजूर | भरलेले | रिक्त | मंजूर | भरलेले | रिक्त | ||
एकूण | ३४ | १० | २४ | ८६ | ४२ | ४० | ३४ | ८ | २६ |
अनु.क्र. | आरोग्य व्यावसायिक | जिल्ह्यातील एकूण संख्या (डिसेंबर २०२४) |
---|---|---|
१ | ओ. पी. डी. मध्ये आढळलेल्या नवीन रुग्णांची एकूण संख्या | 56186 |
२ | आय. पी. डी. मध्ये दाखल झालेल्या रुग्णांची एकूण संख्या | 19081 |
३ | ओ. पी. डी. मध्ये आढळलेल्या पाठपुरावा प्रकरणांची एकूण संख्या | 25858 |
४ | घरगुती उपचारांमध्ये आढळलेल्या नवीन रुग्णांची एकूण संख्या | 3722 |
५ | घरगुती उपचारांमध्ये आढळलेल्या पाठपुरावा प्रकरणांची एकूण संख्या | 14612 |
अनु.क्र. | वर्ष | पीआयपी (रु. लक्षांमध्ये) | खर्च | % |
---|---|---|---|---|
१ | 2022-23 | 63.47 | 12.31 | 19.39 |
२ | 2023-24 | 62.02 | २९.१७ | ४७.०४ |
३ | २०२४-२५ | 33.65 | ७.२६ | २१.५७ |
लाभार्थी:
वर उल्लेख केला आहे
फायदे:
वर उल्लेख केला आहे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केला आहे