बंद

    आदिवासी प्रभावित क्षेत्रांसाठी योजना

    • तारीख : 15/01/2025 -

    महाराष्‍ट्रातील आदिवासी, अतिदुर्गम व अतिदुर्लक्षित भागाकरीता योजना

    सन २०२४-२५ मंजुर कृती आराखडा

    महाराष्‍ट्रातील एकुण १६ आदिवासी जिल्‍हे आहेत. त्‍यापैकी ५ संवेदनशील आहेत तर ६ अति नक्षलग्रस्‍त आहेत. या भागातील आरोग्‍याशी निगडित असणा-या समस्‍या लक्षात घेता तसेच ज्‍या आरोग्‍य सेवांमध्‍ये प्रशिक्षित कर्मारी उपलब्‍ध नाहित अशा आदिवासीसाठी, अतिदुर्गम व अतिदुर्लक्षित भागासाठी खालीलप्रमाणे योजना सुरु करण्‍यात आल्‍या आहेत.

    • आदिवासी, अतिदुर्गम व अतिदुर्लक्षित भागातील कर्मचा-यांना मिळणाराप्रोत्‍साहन भत्‍ता (हार्डशिप अलउन्‍स)
    • जिल्‍हा रुग्‍णालये मधील समन्‍वय कक्ष
    • गडचिरोली जिल्‍हयातील मोबाईल मेडिकल युनिट
    • नंदुरबार जिल्‍हयातील तरंगता दवाखाना व तरंगती रुग्‍णवाहीका,
    • विशेषज्ञ वैदयकीय व दंत शिबिरे,

    अतिदुर्गम, अदिवासी व नक्षलग्रस्‍त भागाकरीता प्राथमिक आरोग्‍य केंद्रात कार्यरत असणारे वैदयकीय अधिकारी व त्‍यांच्‍या कुंटुबांकरीता प्रशिक्षण व कार्यशाळा (CME)
    प्रोत्‍साहनपर भत्‍ता (ओ. पी. डी)

    प्रोत्‍साहन भत्‍ता हा फक्‍त दुर्गम, अतिदुर्गम व नक्षलवादी भागातील आरोग्‍य केंद्रामध्‍ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनाच अदा करण्‍यात येतो. आरोग्‍य अधिकारी व परिचारिका तसेच विशेषतज्ञांना पगाराव्‍यतिरिक्‍त प्रोत्‍साहनपर भत्‍ता दिला जातो.

    प्रोत्‍साहनपर भत्‍ता ही योजना आदिवासी भागात म्‍हणजेच ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नांदेड,अमरावती,यवतमाळ,गोंदिया, चंद्रपुर, पालघर व गडचिरोली या जिल्‍हयामध्‍ये राबविण्‍यात येते.

    सन २०२४-२५ या अर्थिक वर्षात कर्मचा-यांसाठी मंजुर हार्डशिप अलाउन्‍स

    वेगवेगळ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या श्रेणींसाठी मासिक पेमेंट
    अ.क्र. श्रेणी मासिक पेमेंट
    ए. एन. एम. १०,०००/-
    स्टाफ नर्स / एल. एच. व्ही. १५,०००/-
    वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) समूह – अ ३५,०००/-
    समूह – ब २५,०००/-
    वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ३५,०००/-
    विशेषज्ञ (भिशा, पेडियाट्रिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ) ५०,०००/-

    रुग्‍णालये मधील समन्‍वये कक्ष

    अपात्‍कालीन परिस्थितीत उपकेंद्र, प्रा.आ.केंद्र इत्‍यादी आरोग्‍य संस्‍थामार्फत जिल्‍हा रुग्‍णालयामध्‍ये संदर्भ सेवा दिल्‍या जातात.

    रुग्‍णांना जिल्‍हा रुग्‍णालयामध्‍ये विविध प्रकारच्‍या आरोग्‍य सेवा पुरविण्‍यात येतात, जसे वेगवेगळया विभागामध्‍ये नाव नोंदणी करणे, रक्‍त तपासणे, औषध इ. अति‍दुर्गम भागातुन येणा-या रुग्‍ण सेवा घेण्‍याकरीता अडथळे निर्माणहोतात. परिणामी सेवा घेण्‍यास अधिक वेळ लागतो.

    अशा प्रकारचे रुग्‍ण हे रुग्‍णालयात दाखल होण्‍याकरीता स्‍वःइच्‍छेने तयार नसतात. ब-याच वेळा रुग्‍णालयात दाखल होण्‍याअभावी आरोग्‍य सेवेपासुन वंचित राहतात. यावर मात करण्‍याच्‍या अनुषंगाने राज्‍यात ६ जिल्‍हयामध्‍ये अति‍दुर्गम भागातील रुग्‍णांना संदर्भसेवा देण्‍याच्‍या उद्देशाने रुग्‍णालयामध्‍ये एका समन्‍वये कक्षाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे.

    गडचिरोली जिल्‍हयातील मोबाईल मेडिकल युनिट

    प्रकल्‍पाची ओळख –

    गडचिरोली जिल्‍हा हा परिपुर्ण आदिवासी भाग आहे. जिल्‍हाचे क्षेत्र अंदाजे ३५० कि.मी. आहे. जिल्‍हा रुग्‍णालय गडचिरोली व उपजिल्‍हा रुग्‍णालय अहेरी हे रुग्‍णालय वगळताइतर ठिकाणी दंत तपासणी नेत्र तपासणी रक्‍त तपासणी (पॅथोलॉजी) हया सुविधा मिळत नाही. त्‍यामुळे गडचिरोली जिल्‍हयासाठीIAPया संस्‍थेने Mobile Van उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहे. परंतु उपलब्‍ध वाहनांमध्‍ये मनुष्‍यबळ व इतर खर्चासाठी राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत निधी देण्‍यात आलेला आहे. फिरते वाहनासाठी उपलब्‍ध मनुष्‍यबळासाठी खालीलप्रमाणे निधी देण्‍यात आलेला आहे.

    • मोबाईल डेंटल युनिट (२)
    • मोबईल ऑपथॅलमिक युनिट (२)
    • मोबाईल पॅथॉलॉजी युनिट (२)

    तरंगती रुग्‍णवाहिका

    नंदुरबार जिल्‍हयातील जवळ जवळ ५० गावे ही नर्मदा सरोवरच्‍या पाण्‍याने व्‍यापलेले आहे. या गावाच्‍या

    एका बाजुला डोंगर दरी व एका बाजुला पाणी आहे. त्‍यामुळे राज्‍य सरकारने हया गावांमध्‍ये आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी तरंगता दवाखाना सुरु केलेला आहे. हे तरंगते दवाखान्‍यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स, चालक हे पद मंजुर आहेत. नर्मदा सरोवरच्‍या पाण्‍याने व्‍यापलेल्‍या गावात तरंगता दवाखाना चांगल्‍या स्‍वरुपात सेवा देत आहे.

    तथापी, एखादया वेळेला रुग्‍ण जास्‍त आजारी असल्‍यास किंवा त्‍याला तात्‍काळ आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी व एखादी स्‍त्री प्रसुतीच्‍या वेळी या इतर कारणांमुळे तरंगत्‍या दवाखान्‍याच्‍या सेवा विस्‍कळीत होतात. त्‍यामुळे आरोग्‍य सेवा देण्‍यामध्‍ये अनियमितता निर्माण होते. तसेच नर्मदा सरोवरच्‍या पाण्‍याची पातळी दर वेळेस कमी जास्‍त होत असते. त्‍यामुळे तरंगत्‍या दवाखान्‍याचे ठिकाण ही कायम बदलत असते. वरील कारणांमुळे त्‍यामुळे रुग्‍णांना तरंगत्‍या दवाखान्‍यापर्यंत येण्‍यासाठी पाण्‍यातुन चालत यावे लागते. रुग्‍णांना पाण्‍यातुन चालत येणे हे अत्‍यंत धोकादायक आहे. विशेषतः गर्भधारणा झालेल्‍या स्‍त्रीयांना तसेच जास्‍त आजारी असलेल्‍या रुग्‍णांना तरंगता दवाखाना येईपर्यंत वाट पाहण्‍यासाठी व्‍यवस्थित जागाही नाही.

    वरील सर्व गोष्‍टी लक्षात घेता गर्भधारणा झालेल्‍या स्‍त्रीया, सर्पदंश झालेले रूग्‍ण, अत्‍यंत गंभीर आजारी असणारे रूग्‍ण यांना दवाखान्‍यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत सन २०१३-१४ व २०१४-१५ या अर्थिक वर्षात तरंगत्‍या रुग्‍णवाहीका खरेदी करण्‍यासाठी वृत्‍तपत्रात जाहिरात देण्‍यात आलेली होती. सदर जाहिरातीनुसार तरंगती रुग्‍णवाहीका तयार करण्‍याचे काम पुर्ण करुन फेब्रुवारी २०१७ पासुन तिन्‍ही रुग्‍णवाहीकांचा विमा काढुन त्‍या चालु करण्‍यात आलेल्‍या आहेत.

    वैदयकीय व दंत शिबिरे

    आदिवासी व विगर आदिवासी भागातील रुग्‍णांना विशेषतज्ञांच्‍या सेवा उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या हेतुने राज्‍यातील उपजिल्‍हा रुग्‍णालय/ग्रामीण रुग्‍णालयामध्‍ये एकुण ६९ वैदयकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्‍यात येते.>/p>

    शासकीय /खाजगी वैदयकीय व दंत महाविद्यायाच्‍या विशेषतज्ञांमार्फत राज्‍यातील आदिवासी भागामध्‍ये विशेषतज्ञ वैदयकीय व दंतशिबिरे आयोजित करण्‍यात येतात. या शिबिरासाठी भिषक, शल्‍य चिकित्‍सक, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्‍वचारोग तज्ञ, प्रसुति व स्‍त्रीरोग तज्ञ, दंत चिकित्‍सक व बधिरीकरण तज्ञांची सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतात.

    • प्रत्‍येक शिबिराचा कालावधी ४ ते ५ दिवसांचा असतो.
    • प्रत्‍येक शिबिरासाठी रु.३.२६ लक्ष निधी मंजुर करण्‍यात आलेला आहे.
    • पहिल्‍या दिवशी रुग्‍णांची तपासणी केली जाते.
    • दुस-या व तिसल्‍या दिवशी रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिाया केल्‍या जातात.
    • चौथ्‍या दिवशी रुग्‍णांची शस्‍त्रक्रिया पाश्‍चात काळजी घेण्‍यात येते.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे