बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    1. आरोग्यविषयक जागृती : आरोग्यविषयक समस्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना, धोरणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणेबाबत समाजात जनजागृती वाढविणे.
    2. सुनिश्चित सुलभ आरोग्यसेवा : राज्‍यातील सर्व जनतेस, विशेषतः वंचित आणि आरोग्‍य दृष्‍टया उपेक्षित समाजास, समान व सहज सुलभ आवश्यक त्‍या प्राथमिक व व्दितीय आरोग्य सेवा उपलब्‍ध करणे.
    3. आजार व इजा प्रतिबंध : रोग प्रतिबंधक आजारांचे प्रमाण कमी करणेसाठी, लसीकरण, आजाराचे त्‍वरित निदान आणि आरोग्य तपासणी यासारख्‍या उपाययोजना केंद्रस्‍थानी ठेवणारे कार्यक्रम राबविणे.
    4. आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविणे: तांत्रिक प्रगती, मानव संसाधन विकास व सातत्यापूर्ण आरोग्‍य कार्यक्रमांमध्‍ये सुधारणेव्‍दारे, प्राथमिक आणि व्दितीय स्तरावरील गुणवत्‍तापूर्ण आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे.
    5. सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण प्रणाली बळकटीकरण: भविष्‍यातील आरोग्‍यविषक कल व समस्‍यांविषयी निर्णय क्षमता वाढविण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य सर्वेक्षण प्रणालीव्‍दारे सनियंत्रण करणे.
    6. सहयोगास प्रोत्साहन : आरोग्य सेवा, यंत्रणा तसेच पायाभूत सेवासुविधा यांच्‍या बळकटीकरणासाठी सामाजिक भागधारक, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांचेसोबत शासकीय यंत्रणेच्‍या सहभागास प्रोत्‍साहन देणे.
    7. आरोग्यविषक आणीबाणी सदृश्‍य परिस्थितीला प्रतिसाद : रोगाचा प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आरोग्यविषयक आपदा यासारख्‍या आरोग्‍यविषयक आणीबाणी परिस्थितीवर मात करणेसाठी तयारी करणे आणि त्याविषयी प्रतिकार करणे.
    8. धोरण आणि प्रणाली सुधारणांना पाठिंबा : सर्व स्‍तरावर गुणवत्‍तापूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणे, आरोग्‍यविषयक निधीमध्‍ये वाढ व आरोग्‍य यंत्रणेमधील सुधारणा यामध्‍ये बदल घडवून आणणेकरिता सहकार्य करणे व धोरण निश्चित करणे.
    9. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा : आरोग्यविषयक कार्यक्षम व प्रभावी सेवासुविधा मिळण्‍यासाठी भौतिक व तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे.
    10. कर्मचारी कौशल्ये व कार्यक्षमता वाढविणे: सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांचे तांत्रिक, व्यवस्थापकीय व नेतृत्व कौशल्ये व कार्यक्षमता वाढविणेकरिता प्रशिक्षण व व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.