मौखिक आरोग्य कार्यक्रम
मौखिक आरोग्य कार्यक्रम
मौखिक आरोग्य ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, त्यामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मौखिक आरोग्याच्या आजारामुळे सौंदर्यास बाधा येऊ शकते, अन्न व्यवस्थित चावता येत नाही. तसेच दातांमध्ये वेदना होऊ शकतात. या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर व उत्पादन क्षमतेवर होतो. केंद्र शासनातर्फे राज्यातील ३४ जिल्हयांमध्ये मौखिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याकरीता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे.
मौखिक आरोग्य कार्यक्रमाची उद्दिष्टे
- मुख आरोग्य ज्या घटकांवर अवलंबुन आहे असे घटक (उदा. आरोग्यदायी आहार, मुख स्वच्छतेच्या सवयी, इत्यादी.) विचारात घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे, ग्रामिण व शहरी भागात मौखिक आरोग्य सेवा देणे.
- मुख रोगांचे प्रमाण कमी करण्याकरीता मुख आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे. त्यानुसार सर्व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये येथे मौखिक आरोग्य सेवा सुरु करणे.
- मुख रोगांशी संबधीत प्रतिबंधात्मक उपाय योजना व सर्व साधारण आरोग्य सेवा यांचे एकीकरण करणे यासाठी विविध आरोग्य कार्यक्रम (उदा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम, फलुरोसीस प्रतिंबधक व नियंत्रण कार्यक्रम) यांचा सुयोग्यतेने समन्वय साधणे, याबरोबरच इतर प्रशासकिय विभाग जसे की शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालविकास इ. यांचे बरोबर आंतरविभागीय समन्वय साधणे.
- मुख आरोग्याबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील व्यक्ती / संस्थांचा सहभाग घेणे.
मुख आरोग्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा
उपकेंद्र
- उपकेंद्रातील नियमित सेवांबरोबर मुख आरोग्याबाबत सर्वांना आरोग्य शिक्षण देणे.
- महिना/पंधरवाडयातील एका विशिष्ट दिवशी उदा. माता बालसंगोपन दिन या दिवशी मुख आरोग्याच्याबाबत चर्चासत्रे आयोजित करणे.
- मुख रुग्णांना प्रा.आ.केंद्र अथवा प्रथम संदर्भ सेवाकेंद्रामध्ये उपचाराकरीता संदर्भीत करणे.
- किरकोळ मुखरोगांच्या तक्रारीसाठी वेदनाशामक औषध देणे.
- मौखिक आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीचे जतन करणे.
प्रा.आ. केंद्र
- वैद्यकिय अधिकारी यांच्या कडून मुख रुग्णांची बाहय रुग्णविभागात तपासणी करणे.
- इतर विभागाच्या मदतीने मुख उपचार शिबीरे आयोजित करणे.
- रुग्णालयांना सादर करण्यात येणाऱ्या अहवालाचे विहित नमुन्यात जतन करणे.
- शाळेतून संदर्भित करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सर्व सेवा देणे.
- आवश्यकतेनुसार रुग्णांना प्राथमिक संदर्भ सेवा देणे.
ग्रामीण रुग्णालये
- ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा रुग्णालये ही प्रा.आ.केंद्र व उपकेंद्रासाठी प्रथम संदर्भ सेवा रुग्णालये म्हणून असतील.
- सदर विभागाच्या मदतीने मुख उपचार शिबीरे आयोजित करणे.
- विविध विहीत प्रपत्रात अहवाल जतन करणे.
- शाळेतून संदर्भित करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सर्व सेवा देणे.
जिल्हा रुग्णालये
- प्रा.आ.केंद्र व ग्रा.रु मधून संदर्भित झालेल्या रुग्णांवर उपचार करणे. डेंचर, फ्रॅक्चर रिडक्शन इ. रुग्णांना गरजेनुसार बसविणे, साप्ताहिक अथवा मासिक कालावधीमध्ये ऑर्थोडेंटिस्ट याची सेवा रुग्णांना देण्याचे नियोजन करणे.
- प्रा.आ.केंद्र व रुग्णालया कडून प्राप्त होणाऱ्या अहवालाचे एकत्रीकरण करणे.
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांच्या सहाय्याने मुख आरोग्य कार्यक्रमांतर्गत कार्ये पार पाडणे.
- राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मुख आरोग्य सेवा देणे.
- राज्यामध्ये २१ जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, ३६४ ग्रामीण रुग्णालये, ९५ उपजिल्हा रुग्णालये व १३ स्त्री रुग्णालये आहेत. त्यामध्ये एकूण २८८ ठिकाणी डेंटल क्लिनिक कार्यरत आहेत व तेथे कंत्राटी अथवा नियमित दंत शल्य चिकित्सक उपलब्ध असून त्यांच्या मार्फत मौखिक आरोग्य तपासणी, समुपदेशन व उपचार इत्यादी सेवा देण्यात येतात.
एस. आर. क्रमांक | वर्ष | पीआयपी | खर्च | % |
---|---|---|---|---|
1 | 2019-2020 | 451 | 1.65 | 0.38% |
2 | 2020-2021 | 1487 | 108.20 | 7.3% |
3 | 2021-2022 | 1832.75 | 1016.21 | 55.5% |
4 | 2022-2023 | 1417 | 95.53 | 6.7% |
5 | 2023-2024 | 1071 | 858.04 | 80.11% |
6 | एप्रिल 2024 to डिसेंबर 2024 |
133.88 | 25.73 | 19.22% |
लाभार्थी:
वर उल्लेख केला आहे
फायदे:
वर उल्लेख केला आहे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केला आहे