दृष्टी आणि ध्येय
ध्येय
प्रतिक्रियाशील व सर्वसमावेशक आरोग्य सुविधेव्दारे रोग प्रतिबंध, निरोगी जीवनशैली व प्रभावी उपचार पध्दती मिळणेसाठी कार्यक्षम व नाविन्यपूर्ण आरोग्य यंत्रणा सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे.
दृष्टी
उपेक्षित व वंचित समाजासह समुदायातील सर्व व्यक्तींचे शारीरिक, सामाजिक तथा मानसिक आरोग्यासह हितकारक, सर्व समान व सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी उच्च दर्जाच्या प्राथमिक व व्दितीय स्तरावरील आरोग्य सेवा पुरविणे तसेच सेवेचा लाभ मिळत नसलेल्या व उपेक्षित वर्गाकडे विशेष लक्ष केंद्रित करणे.